Header Ads

सातारा एज्युकेशन सोसायटीने उचलली अनाथ मुलांची शैक्षणिक जबाबदारी satara


सातारा
: सातारा जिल्हयात 81 वर्षांची यशस्वी वाटचाल असणारी आणि महाराष्ट्रातील  नामवंत शिक्षण संस्थेने कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्याथर्यांची 2021-22 या वर्षासाठी मोफत प्रवेश व त्याच्या सर्व शैक्षणिक शिक्षणांची जबाबदारी संस्था सामाजिक बांधिलकी या नात्याने घेणार असल्याची माहिती सातारा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. चेतना माजगावकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

प्रसिध्दीपत्रकात, कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली असून अनेक मुले निराधार झाले आहेत. त्यांना आधार देण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्यालाच हातभार म्हणून महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण संस्था असणा-या सातारा एज्युकेशन सोसायटीने सामाजिक बांधिलकी या नात्याने कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्याथर्यांची शैक्षणिक जबाबदारी संस्थेने उचलण्याचे ठरवले आहे. संस्थेच्या बालवाडी ते पॉलिटेक्निकपर्यंत विविध शाखा आहेत. संस्थेच्या केशव गोरे पूर्वप्राथमिक शाळा – बालवाडी, आण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय – पहिली ते चौथी, अनंत इंग्लिश स्कूल –पाचवी ते दहावी, एन.बी.देशमुख कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण – 11 वी, 12 वी, सातारा पॉलिटेक्निक, सातारा – विविध प्रकारचे कोर्स, सुमन ढेकणे कॉलेज या विविध शाखा असून शैक्षणिक गुणवत्ता उत्कृष्ट आहे. संस्थेच्या या सर्व शाखांमध्ये  कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्याथर्यांना  2021-22 या वर्षासाठी मोफत प्रवेश व त्यांच्या सर्व शैक्षणिक शिक्षणाची जबाबदारी संस्था सामाजिक बांधिलकी या नात्याने घेण्यात येणार आहे. तरी संस्थेच्या सर्व शाखांमध्ये कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्याथर्यांनी किंवा त्यांच्यांशी संबंधित असणा-या नातेवाईकांनी संपर्क साधावा असे आवाहनही डॉ. माजगावकर यांनी केले आहे.

No comments