Header Ads

कुकुडवाड पॅटर्नचा अवलंब तालुक्यातील इतर गावांनीही घ्यावा; उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी satara


सातारा
: कुकुडवाड ता माण येथे संकल्प इंजिनिअरिंग संस्था, ग्रामपंचायत कुकुडवाड व ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नाने सुसज्ज विलगिकरण कक्षाचे उदघाटन उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी संकल्प संस्थेचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, सरपंच संजय जाधव डॉ गजानन जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.

 मोठी लोकसंख्या असताना देखील कोरोना संसर्ग रोखण्यात व रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात कुकुडवाड मध्ये राबविलेल्या योजना अत्यंत प्रभावी असून या पॅटर्न चा अवलंब तालुक्यातील इतर गावांनीही करावा असे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी म्हटले, कुकुडवाड येथे कोव्हीड 19 च्या अनुषंगाने बाधित रुग्णांच्या विलगिकरण कक्षाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले संकल्प इंजिनिअरिंग संस्थेच्या वतीने बेड्स पुरवण्यात आले तर इतर सर्व सोयी कुकुडवाड ग्रामपंचायत मार्फत पुरवण्यात येतील, रुग्णांच्या दैनंदिन तपासणी साठी रिटायर्ड वैद्यकीय अधिकारी डॉ गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ किरण कुंभार, डॉ वाघमारे, डॉ कदम, डॉ सोनवणे, डॉ शेट्ये यांचे पथक तयार करण्यात आले असून सर्वजण विनामूल्य सेवा देतील असे डॉ जाधव यांनी सांगितले. कुकुडवाड प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका यांच्याशी चर्चेदरम्यान प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी प्राथमिक माहिती घेत काही सूचनाही केल्या, उपकेंद्रातील आरोग्यसेवक श्री विरकर व आरोग्य सेविका राजश्री घोरपडे यांचेकडून सद्यपरिस्थितीची संपूर्ण माहिती घेऊन संशयितांच्या अँटिजेन टेस्ट तसेच सर्व्हे वाढवण्याच्या सूचना देत आशा स्वयंसेविका करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन श्री सूर्यवंशी यांनी केले.

कुकुडवाड पोलीस पाटील सौ वैशाली उमेश काटकर यांनी राबविलेले उपक्रम व अंमलबजावणी पथक याबद्दल प्रांताधिकारी यांनी पोलीस पाटील व त्यांच्या स्वयंसेवकांचे अभिनंदन केले, ग्रामपंचायत सदस्य मनोज काटकर यांनी गावात मोफत आयुष काढा गोळ्या व आर्सेनिक अलबम गोळ्यांचे वाटप केले असून ग्रामपंचायत तर्फे घरोघरी सॅनिटायझर वाटप केल्याचे तसेच मुंबई पुण्यातील स्थायिक गावी येत असल्यास त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच त्यांना गावात प्रवेश दिला जात असल्याचे सरपंच संजय जाधव यांनी सांगितले.

यावेळी मंडलाधिकारी श्री सानप, गावकामगार तलाठी श्री खताळ, ग्रामविकास अधिकारी श्री काळे एस एस तसेच माजी पंचायत समिती सदस्य उत्तमराव काटकर, तुषार कुलकर्णी, जनसहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेदखान मुलाणी, जयंत शेट्ये कुकुडवाड ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

No comments