Header Ads

अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना satara


सातारा
: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून कोविडमुळे दोन्ही पालक मृत्यु पावल्याने अनाथ झालेली बालके दत्तकासाठी उपलब्ध आहेत, असे संदेश फेसबुकवर व व्हॉटसॲप वर फिरत आहेत. परंतु हे मेसेज चुकीचे आहेत आणि अशा प्रकारे बालके दत्तकास दिली गेली तर ते बेकायदेशिर आहे. या विषयाचे गांर्भीय लक्षात घेऊन महिला व बाल विकास आयुक्तालय आणि Save the Children (India) या दोघांच्या संयुक्त विद्यमाने मदत कक्ष तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.एस. ढवळे यांनी दिली आहे.

या मदत कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 1098 व मो.क्र. 8308992222, 7400015518 असा आहे. कोविड अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यु झाला असेल आणि बालकास कोणीही नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा बालकांसाठी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.एस. ढवळे यांनी कळविले आहे.

No comments