Header Ads

जावळी तालुक्यातील कुसुम्बी ग्रामपंचायतीने निर्बंध तोडणाऱ्या लग्न समारंभावर केली दंडात्मक कारवाई satara


सातारा
: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गर्दीचे कार्यक्रम, लग्न समारंभाच्या संख्येवर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून निर्बंध घातले असताना जावळी तालुक्यातील कुसुम्बी या गावात लग्नाला मर्यादे पेक्षा जास्त लोक असल्यामुळे आज त्यांच्यावर 50 हजाराची दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात आली.

कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी, कुसुम्बी ता.जावळी येथे एका विवाहाप्रसंगी 100 पेक्षा जास्त व्यक्ती लग्नाला उपस्थित असल्या कारणाने ग्रामपंचायतीकडून  50 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहें. यापुढेही निर्बंध तोडणाऱ्यावर अशीच कारवाई होईल असे प्रशासनाने सांगितले आहें.

No comments