Header Ads

जिल्हाधिका-यांच्या नावाने सोशल मीडियामध्ये फिरणारा ‘तो’ संदेश खोटा satara


सातारा
  : ‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने साताऱ्या सह पुणे विभागातील काही जिल्हयात व्हॉटसॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही  खोडसाळ प्रवृत्तीचे लोक पसरवत आहेत. या संदेशामध्ये दैनदिन जिवनावश्यक वस्तू हाताळणीसह वृत्तपत्रे बंद करण्याबाबत नमूद करण्यात आले  आहे. अशी कोणतीही माहिती वा संदेश सातारा जिल्हा माहिती कार्यालयाकडून काढण्यात आला नाही. हा संदेश खोटा असून अशा  बनावट मेसेजमधील आवाहनाला कोणीही बळी पडू नये असे  आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले आहे. अशा आपत्तीच्या काळात लोकांची दिशाभूल होईल असा कोणताही मजकूर जिल्हा माहिती कार्यालयाचे नाव टाकून खोडसाळपणे पसरविणाऱ्या संबंधितावर यापुढे कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.

No comments