Header Ads

सातारा हद्दवाढीतील नागरिकांवर पश्चाताप करण्याची वेळ येवू देवू नका; बाळासाहेब महामूलकर यांचा पालिकेला इशारा satara


सातारा
: शहराची हद्दवाढ होवून समाविष्ट होणाऱ्या भागाला चांगल्या सुविधा मिळतील अपेक्षेने नागरिकांनी पालिका हद्दीत येण्याचे मान्य केले. मात्र, हद्दवाढ होवून ही समाविष्ट झालेल्या विलासपुर येथील नागरिकांना मुलभूत व आरोग्याच्या सुविधा पालिकेकडून दिल्या जात नाहीत. त्यामुळे भविष्यात पश्चाताप होवून "गडया आपला गावच बरा", असा  विचार करण्याची वेळ विलासपुर नागरिकांवर येवू देवू नका, असा इशारा युवा नेते बाळासाहेब महामूलकर यांनी पालिकेला निवेदनाद्वारे दिला आहे.

नगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेले विलासपूर आणि त्रिशंकू परिसरामध्ये कोरोना रोगाने थैमान घातले आहे. विशेषतः फॉरेस्ट कॉलनी विलासपूर मध्ये अनेक लोकांना प्रादुर्भाव झालेला आहे. लोकांना काही समजेनासे झाले आहे. नगरपालिकेचा टॅक्स भरण्यात आघाडीवर असलेल्या या परिसरामध्ये कोणतीही नगरपालिकेची सुविधा उपलब्ध नाही. रुग्णांना कुठलीही औषधउपचार बाबत सोय नाही. त्यांना कोणी वाली नाही. किडया मुग्यांसारखे लोकांचे जीव जात आहेत. अशा संकटात नगरपालिका प्रशासन डोळयावर पट्टी बांधून झोपले असेल तर ती बाजूला करून विलासपूर भागात तात्काळ कोरोना प्रतिबंधक उपाय योजना यंत्रणा करण्यासाठी पाठवावीत. येथील जनतेचे सगळे जीवन रामभरोसे झाले आहे. मुख्याधिकारी यांनी परिसराची पहाणी करुन आवश्यक असल्यास कडक कार्यवाही करावी. पुर्ण परिसर कन्टीमेंट झोन करुन प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नगरपालिकेच्या वतीने तात्काळ प्रयत्न करावेत. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधीत लस या परिसरातील नागरीकांना मिळण्यासाठी विलासपूर ग्रामपंचायत ऑफीस याठिकाणी लसीकरण केंद्र
करण्यात यावे, अशी मागणी महामूलकर यांनी केली असून ह्याबाबत उपाययोजना न झाल्यास कालांतराने विलासपूर नागरिकांना हद्दवाढीत समाविष्ट झाल्याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा लागेल, असा ही इशारा त्यांनी पालिकेला दिला आहे.

No comments