Header Ads

जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे निवडणुकीच्या बूथ निहाय पद्धतीने सुरू करा; चिन्मय कुलकर्णींची पालकमंत्र्यांकडे मागणी satara


सातारा
: जिल्ह्यात करोनाने अक्षरशा थैमान घातले आहे. इतक्या भयावह परिस्थितीमध्ये लोकाना हॉस्पिटलमध्ये  बेड मिळत नाहीत. त्यामुळे अनेक लोकांना जीव देखील गमवावा लागला आहे. प्रशासनाने कोरोनाला थांबवण्यासाठी लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ निवडणुकीच्या बूथ निहाय लसीकरण केंद्रे उभी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चिन्मय कुलकर्णी यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

कुलकर्णी यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, प्रत्येक गावात शाळा आहे. कोरोनामुळे बहुतांश शाळा बंद आहेत. आणि अजुन 2 महीने शाळा बंद राहतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या सर्व शाळा आपण लसीकरण केंद्र म्हणून वापर करू शकतो. त्याच प्रमाणे आपण फ्रंटलाइन वर्कर याना आपण 2 डोस लसीकरण पूर्ण केले आहेत. त्या सरकारी कर्मचाऱ्यांचा आपण लसीकरन केंद्र चालावण्यासाठी वापर करू शकतो. तसेच ज्या दुर्गम भागातील वयस्कर लोक येऊ शकत नाहीत तिथे आपण जाऊन लसीकरण करू शकतो. यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्था देखील मदत करतील आणि 100% लसीकरण पूर्ण होईल. आम्हाला खात्री आहे की आपण यावर जिल्हाधिकारी व प्रशासन व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राज्यात लसीकरणात सातारा जिल्ह्याचा पहिला क्रमांक पटकावेल. त्यामुळे आपण तात्काळ निवडणुकीच्या बूथ निहाय पद्धतीने लसीकरण केंद्रे सुरू करावी अशी मागणी चिन्मय कुलकर्णी यांनी केली आहे.

No comments