Header Ads

महामुलकर कुटुंबीयांनी जोपासली सामाजिक बांधिलकी satara


आपले वडील स्वर्गीय लक्ष्मणराव नाना महामुलकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रम आणि खर्चास फाटा देत वडिलांचे समाजाप्रती असणारे दातृत्व असलेली शिकवन पुढे नेण्याच्या विचाराने विलासपूर येथील ज्ञानेश्वर आणि बाळासाहेब महामुलकर यांनी सातारा शहरात सुरू असलेल्या करोनाच्या संकटात एक सामाजिक कर्तव्य आणि बांधिलकी म्हणून गोडोली येथे करोना रुग्णांसाठी चालू करण्यात आलेल्या श्री साई आयसोलेशन सेंटर तसेच पुष्कर कोविड केअर सेंटर विसावा नाका मधील सर्व रुग्णांना आरोग्यवर्धक काढा पावडर घरातील महिलांनी बनवलेले पोळीभाजीचे फूड पॅकेट पाणी बॉटल सॅनिटायझर आणि एन ९५ मास्क  देण्यात आले. याबरोबरच या संकटात आपला जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांना भाजी-फळे विक्रेत्यांना घंटागाडी वरील लोकांना एमआयडीसीतील मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना सुरक्षारक्षकांना वाहतूक पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करून पूर परिस्थितीत आणि मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुद्धा समाजासाठी काही ना काही मदत करण्याचा  पायंडा पुढे चालू ठेवून आजोबांच्या प्रती असलेली आपुलकी म्हणून त्यांचे नातू मयूर महामुलकर आणि अरिंजय महामुलकर या बंधूंनी पुढे होऊन या मदतीचे वाटप केले. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.

No comments