Header Ads

रेशनिंग वाहनांना जीपीआरएस बसावा तसेच ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करा ; अन्यथा आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन : दादासाहेब ओव्हाळ satara


सातारा
: केंद्र शासन महाराष्ट्र शासन अनेक प्रकारच्या आश्वासनाचा बाजार मांडत आहे. त्याच वेळेस रेशनिंग धान्य मिळते ते इतरत्र कुठे जाऊ नये व निकृष्ट धान्य मिळू नये, याकरिता रेशनिंग वितरण करणाऱ्या वाहनांना जीपीआरएस बसवणे गरजेचे आहे, असा शासनाचा आदेश असतानाही साताऱ्यातील रेशनिंग वितरण ठेकेदारांनी मनमानी कारभार करून व अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधींचा दबाव आणून दहशत करित आहेत. ही दहशत मोडून काढण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संबंधित रेशनिंग वितरण करणारे कॉन्ट्रॅक्टर व त्याचे सहकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास पुणे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला आहे.

प्रत्येक तालूक्यातील पुरवठा अधिकाऱ्याच्या व रेशनिंग वितरण करण्यासाठी लागणाऱ्या वाहनांना जिपीआरएस बसवणे तसेच गाड्यांचे फिटनेस सर्टिफिकेट गरजेचा आहे. तरी काही गाड्या या विदाऊट फिटनेसच्या तसेच जीपीआरएस न बसवलेल्या आहेत. पुरवठा ठेकेदार  लोकप्रतिनिधीच्या बगलबच्चे यांच्या गोडवाना वाहने खाली करतात आणि नंतर तिथून निकृष्ट माल भरू प्रत्येक गावात वितरण केलं जात आहे. अशाप्रकारे व त्यातील पोत्यांची हेराफेरी व पोती काढून घेतले जातात आणि त्यावरूनच संबंधित ठेकेदार व त्याचे पार्टनर्स हे गडगंज झाले आहेत. तरी संबंधित आजच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी. त्यांच्या बँकेचे खाते तपासण्यात यावे तसेच संबंधितांना पूर्वी ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या कॉन्ट्रॅक्टर कडून मदत होत आहे.

संबंधित पूर्वीचा कॉन्टॅक्टर हेच अप्रत्यक्ष कॉन्टॅक्टर आहेत आणि पुढे दाखवण्यात येणारा कॉन्ट्रॅक्टर व त्याचे पार्टनर हे मधले दलाल आहेत. या दलालांनी जिल्ह्यातील दोन मोठ्या लोकप्रतिनिधींच्या ताकतीवर अधिकाऱ्यांवर दहशत ठेवली आहे. तरी संबंधित अधिकारीही त्यांच्या दादागिरीला बळी पडत आहेत. तरी माननीय मुख्यमंत्री यांनी याबाबत गाभिर्यपूर्वक लक्ष घालून तपास करावा ,कारण सर्वसामान्य चांगल्या प्रतीचे धान्य मिळेल यासाठी प्रयत्न करावा व संबंधितांच्या याबाबतची सखोल चौकशी करण्यात यावी.अन्यथा रिपाइं पुणे आयुक्त कार्यलयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला आहे. यावेळी रिपब्लिकन जनरल कामगार युनियन जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश गाडे, कार्याध्यक्ष विक्रम वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ धोत्रे, ब्ल्यू फोर्स जिल्हाध्यक्ष किरण ओव्हाळ, महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई शिंदे उपस्थित होते.

No comments