Header Ads

कोरोना महामारीत सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना त्वरित मदत द्या; रयत क्रांती संघटनेची मागणी satara


सातारा
: कोरोना महामारीत सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना त्वरित मदत द्या अन्यथा राज्यभर  तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला आहे. सातारा जिल्हा रयत क्रांती संघटनेच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन नुकतेच सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे, मधुकर माने आदी उपस्थित होते.

मागील एक वर्षापासून राज्यातील नागरिक कोरोना व नैसर्गिक आपत्ती व बेजबाबदार राज्यसरकारमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. तसेच छोटे व्यवसायिक सुद्धा प्रचंड अडचणीत आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने 
आत्तापर्यंत झालेल्या कर्ज माफीमध्ये लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफी करण्यात यावी व तात्काळ पिक कर्ज देण्यात यावे. छोटे उद्योजक व व्यावसायिक यांना प्रत्येकी एक लाखापर्यंत मदत करण्यात यावी. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा. कोरोना रुग्णांना सरसकट महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा व पात्र रुग्णांचे पैसे ज्या हॉस्पिटलने घेतले असतील ते पैसे रुग्णांना परत मिळवण्याचे आदेश व्हावेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज माफी मिळावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेतर्फे राज्यातील नागरिक व शेतकरी यांच्यासाठी करत आहोत. 

कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्ती असून या काळामध्ये शेतकरी व व्यवसायिक यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शासन व अत्यावश्यक सेवेमध्ये राज्याला मदत केली आहे परंतु त्यांच्याकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे शेतकरी,छोटे व्यवसायिक अडचणीत आले असून अशा काळामध्ये शासन व प्रशासनाने संबंधित व्यक्तींना मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे वरील मागण्यांचा संवेदनशीलपणे सहानुभूती पूर्वक विचार करून त्वरित निर्णय सरकारने घ्यावा अन्यथा कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्ती असून या काळामध्ये शेतकरी व व्यवसायिक यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शासन व अत्यावश्यक सेवेमध्ये राज्याला मदत केली आहे परंतु त्यांच्याकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे शेतकरी,छोटे व्यवसायिक अडचणीत आले असून अशा काळामध्ये शासन व प्रशासनाने संबंधित व्यक्तींना मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे वरील मागण्यांचा संवेदनशीलपणे सहानुभूती पूर्वक विचार करून त्वरित निर्णय व्हावेत अन्यथा रयत क्रांती संघटनेच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

No comments