Header Ads

एक वेळ अन्न त्याग करून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू, कोयना जलाशयात उतरून घेतली शपथ satara


पाटण
: श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा   सोमवारी आठवा दिवशी या दिवसांपासून आंदोलक प्रकल्पग्रस्त जनतेने  एक वेळ अन्नत्याग करत आंदोलनाच्या दुस-या टप्पास सुरवात केली असून प्रत्यक्ष जमीन वाटपास सुरवात झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी शपथ  कोयना जलाशयात उतरुन आंदोलकांनी घेतली. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सह्याद्री अतिथीगृह येथील निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्ष सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. आंदोलनाचा आज दुसरा टप्पा सुरू होत आहे, यामध्ये महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातील साडेपाच हजार कुटुंब खातेदार व त्यांचे कुटुंबीय असे एकूण पंचवीस हजार ते सव्वीस हजार लोक आंदोलनात सहभागी झाले आहेत.
कोयनेचे प्रश्न हे सातारा जिल्ह्यातील निष्क्रिय अधिकारीच लांबवत आहेत .त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गावागावात एक वेळचे अन्नत्याग करून आपल्या दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. ही लढाई निकरीने व प्रत्यक्षात अंबलबजावणी प्रारंभ न झाल्यास आरपारची लढाई लढू असा इशारा कोयना धरणग्रस्त व अभयारण्य ग्रस्त जनतेने देत सोमवारी सकाळी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात उतरून प्रकल्पग्रस्तांनी कोयनामाईची शपथ घेतली . वेळ पडल्यास  आंदोलन अधिक तीव्र करून होणाऱ्या परिणामास सातारा जिल्ह्याचे प्रशासन व महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनात सातारा..... सांगली जिल्ह्यातील लोक सहभागी असून श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, यांच्यासह  हरीचंद्र दळवी, हे कार्यकर्ते या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.


 "आंधळ दळतय नि कुत्र पीठ खातय" : जिल्हा पुनर्वसन अधिका-यांचा कारभार

 सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचा जे काम आता सुरू आहे ते काम म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खाताय अश्या पद्धतीने सुरू त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळेचं विलंब होत आहे त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

No comments