Header Ads

कर्मवीर भाऊराव पाटील यांची 62 वी पुण्यतिथी साजरी; पालकमंत्र्यांकडून अभिवादन satara


सातारा
: सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची 62 वी पुण्यतिथी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी  कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, विठ्ठल शिवलकर, डॉ. प्रतिभा गायकवाड, शिवलिंग मेनकुदळे  यांच्यासह रयत शिक्षण संस्थेतील पदाधिकारी उपस्थित होते.

No comments