Header Ads

2502 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू : 2361 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज satara


सातारा
: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2502 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 36 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

 तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 126 (5240), कराड 233 (16378), खंडाळा  157 (6765), खटाव 173 (9350), कोरेगांव 192 (9252),माण 337 (6980), महाबळेश्वर 9 (3379), पाटण 136 (4463), फलटण 388 (13977), सातारा 585 (25211), वाई 151 (8289 ) व इतर 15 (594) असे आज अखेर  एकूण   109878  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (105), कराड 0 (449), खंडाळा 0 (85), खटाव 6 (268), कोरेगांव 5 (239), माण 4 (147), महाबळेश्वर 0 (32), पाटण 1 (120), फलटण 1 (194), सातारा 15 (770), वाई 3 (201) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2610 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

2361 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2361 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी  दिली.

एकूण नमुने -559379

एकूण बाधित -109878

घरी सोडण्यात आलेले -86620

मृत्यू -2610

उपचारार्थ रुग्ण-20635

No comments