Header Ads

राष्ट्रवादी युवककडून कोरेगाव पोलिसांना बिसलेरीच्या बॉक्सचे वाटप satara


सातारा
: सध्या सरकारने निर्बंध कडक केल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. कोरेगाव शहरातील प्रत्येक चौकात पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. नागरिक म्हणून आपण देखील त्यांची काहीतरी सेवा करावी या हेतूने कोरेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोरेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना बिसलेरीच्या बॉक्सचे तसेच ग्लुकोन-डी व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानून त्यांचे कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सनी शिर्के, युवानेते अमरसिंह बर्गे, अजित बर्गे, युवानेते गणेश धनवडे, किशोर काशीद, आदित्य शिंदे, चेतन आपटे, किरण देशमुख, सागर कदम, सर्फराज नदाफ उपस्थित होते.

No comments