Header Ads

कोयना धरणग्रस्तांचा पुढील लढ्याचा टप्पा आज जाहीर होणार : डॉ. भारत पाटणकर satara


सातारा
: कोयना धरणग्रस्तांच्या तीन तीव्र लढ्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री यांनी दोन व आत्ताचे उपमुख्यमंत्री ना. श्री. अजित पवार यांनी दोन बैठका घेतल्या. ता.२५ मार्च २०२१ रोजी सह्याद्री अतिथीगृहावर घेतलेल्या बैठकीत ता. १ मे रोजी कोयना धरणग्रस्तांचे प्राथनिधिक स्वरूपात जमीन वाटप करण्याचे निर्देश दिले होते. परंतु हे जमीन वाटप संकलन रजिस्टर अध्यावत व परिपूर्ण नसल्यामुळे सुरू करता येणार नाही असे अधिकाऱ्यांच्याकडून समजले. त्यामुळे धरणग्रस्तांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. 

आज ता. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आणि प्राथमिक स्वरूपात जमीन वाटप सुरू न झाल्याच्या निमित्ताने कोयना धरणग्रस्तांच्या लढ्याचा पुढील टप्पा जाहीर करणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले. हे आंदोलन कोयना धरणग्रस्त जीव पणाला लावून करतील. कारण तीन वेळा आंदोलने करून, मंत्रालय पातळीवर बैठका होऊन सुद्धा पात्र प्रकल्पग्रस्तांचे संकलन रजिस्टर अध्यावत करून पूर्ण झाली नसल्यामुळे बोगस प्रकल्पग्रस्तांचे जमीन वाटप करण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी लढा करावा लागला होता. त्यामुळे कोयना धरणग्रस्त आता जीवाची बाजी लावून प्राणपणाने लढतील असेही डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले. हा सुरु होणारा लढा सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि अहमदनगर जिल्ह्यात सुरू होणार असून लढा अत्यंत तीव्र परंतु कोरोनाचे शासनाने घातलेले सर्व नियम पाळून होणार असल्याचे ही डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

No comments