Header Ads

सातारा तालुका राष्ट्रवादी युवकच्या रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद satara


सातारा
: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय खा.शरद पवार यांनी कोरोना काळात रक्ताचा कमी पडणारा पुरवठा बघता रक्तदान करण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना केले होते. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवकच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित केली जात आहेत. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष मंगेश ढाणे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील, खा.श्रीनिवास पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील यांची शिबिरास प्रमुख उपस्थित होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात भासणारा रक्ताचा तुटवडा बघता युवकांच्या वतीने घेतलेल्या रक्तदान शिबीराला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद बघून राष्ट्रवादी युवकचे काम अभिमानास्पद असून युवकांनी अशा समाजपयोगी उपक्रमातून या कोरोनाच्या लढाईत प्रशासनाला सहकार्य करावे असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले.  सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी सांगितले.

सातारा जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्यातून आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, विध्यार्थी संघटनेचे अतुल शिंदे, उपाध्यक्ष समीर राजेघाटगे, महिला प्रदेश सरचिटणीस समीद्रा जाधव, युवतीच्या स्मिता देशमुख, पूजा काळे, सोशल मीडिया सेलचे सचिन कुराडे,  प्रथमेश पवार, सागर पवार, शुभम साळुंखे, पारिजात दळवी , विकास अवघडे, विजय कुंभार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments