Header Ads

नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून गोडोलीत ओपन जिमचा शुभारंभ satara


सातारा
: गोडोलीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकप्रिय नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून ओपन जिमची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नुकताच या ओपन जिमचा शुभारंभ गावातील माजी सैनिकांच्या शुभहस्ते करण्यात आला. आजकालच्या आरामदायक जीवनशैली मुळे ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखी,  जडपणा,  स्थूलता तसेच त्यासंदर्भातील इतर शारीरिक व्याधीना सामोरे जावे लागते. यापासून आराम मिळावा यासाठी डॉक्टरांकडुन रुग्णांना हलक्या प्रकारच्या व्यायाम करण्याचा  सल्ला दिला जातो.

 मात्र हा व्यायाम करण्यासाठी शास्त्रशुद्ध  व सुयोग्य व्यायाम साधनांची गरज भासते. तीच गरज लक्षात घेऊन नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी  सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून माजी सैनिकांसाठी असलेल्या विशेष निधीमधून गोडोली गावातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुमारे तीन लाख रुपये किमतीची व्यायामाची साधने ओपन जिम करिता नुकतीच उपलब्ध करून दिली. या व्यायाम साहित्याचे पूजन गोडोलीतील माजी सैनिकांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
माजी उपनगराध्यक्ष अशोक व्यंकटराव मोरे, मेजर भैरू बाजीराव मोरे, विजय परशराम मोरे, हंबीरराव कामठे, सुनील भानुदास मोरे, सदाशिव मोरे,  पोपटराव मोरे, राजू मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान या ओपन जिमचा लाभ  गावातील जेष्ठ नागरिकांना बरोबरच लहान मुले देखील घेत आहेत. या नाविन्यपूर्ण उपयुक्त सुविधेबद्दल नगरसेवक शेखर मोरे यांना धन्यवाद देत आहेत.

No comments