Header Ads

सातारा जिल्हा पोलिस दलातील अकरा अधिकारी, कर्मचार्‍यांना 'डिजी मेडल' satara


सातारा
: सातारा जिल्हा पोलिस दलातील अकरा पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना पोलिस महासंचालक पदक (डीजी मेडल) जाहीर झाले आहे. विविध कामगिरीबद्दल हे पदक जाहीर झाल्यानंतर पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, एलसीबी पथकाचा यामध्ये दबदबा राहिल्याचे समोर आले आहे. डीवायएसपी तानाजी बरडे, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, मकरंद कवडे, पोलिस हवालदार प्रवीण फडतरे, संजय शिर्के, मोहन नाचण, शिवाजी तोडरमल, रविंद्र कदम, शशिकांत गोळे, नितीन शेळके, दादासाहेब बनकर अशी पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांची नावे आहेत.

याबातची यादी दि. 30 रोजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी जाहीर केली आहे. दरवर्षी पोलिस दलात विविध कामगिरी करणारे, नेमून दिलेले कर्तव्य पार पाडणे यासाठी पोलिस महासंचालक पदक दिले जाते. पोलिस दलातील हे पदक महत्वपूर्ण मानले जात आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला राज्यातील 799 पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना हे पदक जाहीर झाले असून सातारा पोलिस दलातील 11 जणांचा यामध्ये समावेश आहे.

डीवायएसपी तानाजी बरडे यांना दरोडेखोर व टोळ्यांविरुध्द केलेल्या कारवाईसाठी हे पदक जाहीर झाले आहे. दरम्यान, अकरा जणांच्या यादीमध्ये एलसीबीतील चौघांचा समावेश आहे. सहाय्यक फौजदार उत्तम दबडे यांना 437 रिवॉर्ड तर पोलिस हवालदार प्रवीण फडतरे  यांना 461 रिवॉर्ड तसेच सातारा पोलिस दलातर्फे त्यांना ‘बहिर्जी नाईक पुरस्कार’ देखील मिळालेला आहे. पोलिस हवालदार दबडे, फडतरे व संजय शिर्के या पोलिसांनी खून, दरोडे, जबरी चोरी अशा गंभीर व क्लिष्ट गुन्ह्यात सहभाग घेत कौशल्याने तपास करुन शेकडो गुन्ह्यांची उकल केली आहे.

No comments