Header Ads

किल्ले अजिंक्यतारा व गोडोली तळयाच्या सुशोभिकरणासाठी नगरपरिषदेने यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण अंदाजपत्रकात भरीव तरतुद करावी : खा.उदयनराजे satara


सातारा
: छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले अजिंक्यतारा येथील संस्मरणीय इतिहास जागता ठेवण्यासाठी अजिंक्यता-यावरील विकासात्मक कामांकरीता आणि गोडोली तळयाचे सुशोभिकरणासाठी सातारा नगरपरिषदेने यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण अंदाजपत्रकात भरीव तरतुद करावी, असा सूचना वजा आदेश खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नगरपरिषदेच्या पदाधिकारी यांना दिला. आजपर्यंत किल्ले अजिंक्यताराचा परिसर आणि गोडोली तळयाचा भाग नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट नव्हता. तथापि चार महिन्यांपूर्वी झालेल्या हद्दवाढीत हा परिसर नगरपरिषदेच्या क्षेत्रात आला आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाची प्राथमिक जबाबदारी नगरपरिषदेची राहणार आहे. त्यामुळेच दर वर्षी किल्ला परिसराचा विकास करण्यासाठी कायमस्वरुपी आर्थिक उपाययोजना केल्या पाहीजे असे नमुद करुन जलमंदिर पॅलेस येथुन दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे की, किल्ले अजिंक्यतारा हा दिपस्तंभाप्रमाणे सातारकरांच्या नेहमीच प्रेरणा देत आला आहे. याच किल्लापरिसरातुन अटकेपार पोहोचलेल्या मराठा साम्राज्याचा कारभार पाहीला जात होता. या किल्यावर युगपुरुष छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांचे अल्पकाळ वास्तव्य होते याचा सार्थ अभिमान सर्व सातारकरांना आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या किल्ले अजिंक्यता-याचा विकास साध्य करण्यासाठी सातारा नगरपरिषदेने

येथील राजसदरेवरुन नागरीकांकरीता पहाता येईल असा लाईट व साउंड शो, गडावरील तळी जोड प्रकल्प, आवश्यक तेथे विद्युतीकरण, गडावरील मंदिरांच्या डागडुजी आणि सुशोभिकरण, वृक्षारोपण इत्यादी कामांसाठी भरीव तरतुद करावी. तसेच गोडोली तळयाची निर्मिती तत्कालीन जिल्हाधिकारी आणि समाजसेवक डॉ.अविनाश पोळ यांच्या मार्गर्शनाखाली करण्यात आली आहे. या तळयाच्या भिंतीवर वॉकिंग पाथवे, तळयाच्या बाजुने वृक्षारोपण करणे, आपन जीम सुरु करणे इत्यादी कारणांसाठी नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकात भरीव तरतुद करण्यात यावी असे सूचना

वजा आदेश खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नगरपरिषदेच्या पदाधिकारी यांना दिले. दरम्यान, नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकामध्ये याकामी भरीव तरतुद करण्याच्या हालचाली पदाधिकारी यांनी सुरु केल्या आहेत. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार किल्ले अजिंक्यतारा आणि गोडोली तळयाच्या सुशोभिकरणासाठी भरीव तरतुद करण्यात येणार असल्याची माहीती नगरपरिषद सुत्रांकडून मिळत आहे.

No comments