Header Ads

कराडमध्ये कोयत्याच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी satara


कराड
: कराडातील मंगळवार पेठेतील पांढरीच्या मारूती मंदिरासमोर गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेतच एका युवकावर कोयत्याने हल्ला झाला. आज रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात वातावरण तणावपूर्ण आहे. या थरारक हल्ल्यात मिलिंद कृष्णत शिंदे (वय 21, रा. बुधवार पेठ) गंभीर जखमी झाला आहे. हल्ला करणारे त्वरीत तेथून पसार झाले. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांचा नेमका उद्देशही व कारणही समजू शकले नाही. या युवकाच्या मानेवर वार झाला असून तो गंभीर आहे, असे उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. पांढरीच्या मारूती चौक परिसरात तणावाचे वातावरण आहे. शिंदेवर हल्ला कोणी केला, त्यामागचे कारण काय होते, याबाबतची माहिती अद्याप समजलेली नव्हती. पांढरीच्या मारूती चौकात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलिसात सुरू होते.

No comments