Header Ads

आ.शशिकांत शिंदेसामान्य कुटुंबाचा आधारु : कर्करोग महिलेने स्वतः येऊन जीवदान दिल्याबद्दल आ. शशिकांत शिंदे यांचे मानले आभार satara


कोरेगाव
: शशिकांत शिंदे साहेबांनी विविध सामाजिक संस्था, देवस्थान ट्रस्टच्या तसेच मुख्यमंत्री सहायता निधीच्या अशा सर्व  माध्यमातून उपचारासाठी लागणारी एकूण 13 लाख रुपये मदत मिळवून दिली आहे. कर्करोग निदान झाल्यानंतर पूर्ण उपचारासाठी गरीब कुटुंबाला आधार देऊन जीवदान देण्याचे अनमोल कार्य विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे साहेबानी केले आहे,  4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून या कर्करोग महिलेने स्वतः येऊन जीवदान दिल्याबद्दल साहेबांचे आभार मानले.

यावेळी कर्करोगावर जिद्दीने मात करणा-या सौ. आशा धनंजय शेडगे(कळंबे ता. सातारा) यांनी कर्करोग झाल्यापासून त्याच्यावर  मात करत असतानाचा अनुभव सांगितला. या काळाविषयी अनुभवकथन करताना सौ. आशा धनंजय शेडगे यांनी कुटुंबातील इतरांची, समाजाची काळजी घेण्याची महिलांची सर्वसाधारण मानसिकता असते, त्यामध्ये त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे केवळ त्या महिलेचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाचीच हानी होते. म्हणूनच महिलांनी स्वत:ची काळजी घेण्याची गरज त्यांनी विषद केली. आरोग्याविषयी खूप जागरूक असून परिस्थिती बिकट असल्याने कर्करोग निदान झाल्यावर हादरून गेले असे सांगतानाच आजाराकडे सकारात्मकतेने बघितले, यात कुटुंबियांची खूप साथ लाभली पण आमदार शशिकांत शिंदे साहेबांचे मोलाचे सहकार्य केले आणि मला जीवदान मिळाले हे त्यांनी आवर्जून सांगितले. 

सत्कारावेळी बोलताना शशिकांत शिंदे साहेब म्हणाले गरजूंना मदत करणे हे माझ कर्तव्य आहे आणि ते मी जबाबदारीने पार पाडेन, गरजू सामान्य लोकांच्या कायमस्वरूपी पाठीशी असेन. यावेळी रमेश उबाळे, शिवाजी महाडिक, भास्करनाना कदम, तेजसदादा शिंदे, अश्विनीदिदी कदम, कोमलताई घोरपडे, किरण राऊत, अभिषेक कुलकर्णी, वैभव भोसले, सायली शेडगे तसेच विविध स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments