Header Ads

ढाबा, पैसा आणि गुंडगिरीच्या जीवावर काही ग्रामपंचायती निवडून आणल्या त्यांनी आमच्या नेत्यावर बोलू नये : रमेश उबाळे satara


सातारा
: आमदार शशिकांत शिंदे अपघाताने ५ वर्षे नव्हे तर २० वर्षे निवडून आलेले आहेत. मतदारसंघ बदलून कामाच्या आणि लोकांच्या आपुलकीच्या जीवावर आमदार शशिकांत शिंदे हे आमदार झालेले आहेत. कोरेगावमध्ये आ. शशिकांत शिंदे आता स्थायिक झालेले आहेत आणि ते कोरेगावकर झालेले आहेत. तुमच अपयश लपविण्यासाठी उपऱ्याची भाषा करण्यापेक्षा, जसे जि.प. च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर सर्वाना सोडून पळून गेला होता तसे आमदार शशिकांत शिंदे पळून जाणारे नाहीत तर लढणारे आहेत. तुमची आणि त्यांची बरोबरी होऊच शकत नाही. एवढा राजकीय अनुभव, एकनिष्ठता आ.शशिकांत शिंदे साहेबांकडे आहे. आपली निष्ठा कोणत्या पक्षावर आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. आजच्या घडीला मतदार संघातील एकही जुना कट्टर शिवसैनिक तुमच्या बरोबर नाही. स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यात पूर्णपणे भाजपचा जातीवादी अजेंडा तुम्ही चालवत आहे.  ढाबा आणि पैसा, गुंडगिरी संस्कृती कोणाकडे आहे याचा पुराव्यासहित उत्तर देऊ. 

कोरेगाव मध्ये फिरला, एखाद्या कलाकारासारखी वेगवेगळी भूमिका बदलून वागले, स्वतःची प्रतिमा अशा पद्धतीची दाखवली. प्रतिमा दाखवताना साधू-संतासारखी आणि वागताना त्याच्या उलट. पैशाची संस्कृती कोरेगाव मध्ये सुरू केली. आजही निवडणुका लोकप्रियतेवर होत नाहीत हा आमचा थेट आरोप आहे, आणि ही कोरेगाव, सातारा, खटाव मधील जनता स्वतः बोलत  आहे. आपल्याला निवडून दिल्यानंतर आपण कोरेगावकरांचा अपमान केला ही परिस्थिती आहे. हॉटेल, ढाबे कसे कोणी बुक केली ही सर्वांना ज्ञात आहे. तरुण पिढी बरबाद करता ही वस्तुस्थिती आहे. फसवणुकीचे गुन्हे किती आहेत ते पाहावे. त्याचे पुरावे पाहिजे असतील तरी आम्ही द्यायला तयार आहोत. गुंडगिरी दहशत पसरवणे हे कोणाचे काम आहे हे सर्व मतदार संघाला माहीत आहे. गरीब रामोशी मुलाला मारण्यापासून ग्रामपंचायत निवडणुकीत गावोगावी गुंडांचा वापर करून दहशत पसरवली. आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी लोकांची कामे करून संस्कृती जपली. तुम्ही फक्त प्रकल्पाला इनामदार नाव दिले याव्यतिरिक्त कोणते इरिगेशन चे काम केले ? जिहे-कठापूर, वसना-वांगना याचा आराखडा पासून सर्व नियोजन करून शेतामध्ये पाणी पोहोचवण्या पर्यंत आमदार शशिकांत शिंदे यांच्या कारकिर्दीत काम झाले. याचा तुम्हाला विसर असेल पण जनतेला आणि शेतकऱ्यांना नाही. आजही आ. शशिकांत शिंदे साहेब लोकांची कामे अधिकाऱ्यांकडून प्रेमाने करून घेतात. तुम्ही अधिकाऱ्यांना शिवीगाळ करता, नीट वागणूक देत नाही. अशाप्रकारची संस्कृती ही सर्वजण आता अनभुवत आहेत. त्यांना बदल कळलेला आहे. कोरोना काळात पहिले काही महिने भूमिगत होता, गाडीत एकटे फिरत होता, कार्यकर्त्याला सुद्धा बसवत नव्हता. आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी कोरोना काळात मुंबईतील नागरीकांना भाजीपाला व्यवस्थित मिळावा यासाठी रात्रंदिवस बैठक घेऊन कामे केली.आघाडीच्या पवार साहेबांनी,  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी टाकलेल्या जबाबदारीला आ. शशिकांत शिंदे साहेबांनी पूर्ण केले. कोणताही खंड पडू दिला नाही. त्या काळात नवी मुंबई, सातारा जिल्हा , कोरेगाव मतदार संघ यामध्ये चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. कोरोना सेंटर उभे राहत असताना मला का बोलवले नाही या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करत बसण्याचे काम केले. कोव्हीड सेंटर काढले म्हणून गाजावाजा केला पण त्या कोव्हीड सेंटर मध्ये मोफत रेडमीसिव्हर इंजेक्शन सुद्धा आमदार शशिकांत शिंदे साहेबांमुळे मिळत होते. त्याला तुमच्या कडून ८०-९० हजार मागितले जात होते. त्या काळात रात्रंदिवस बैठक घेऊन जनतेसाठी काम केले आहे त्याला तुमच्या पोचपावती ची गरज नाही. सगळीकडे मदत पोहोचवण्याचे काम आ. शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या काळात केले. औषधे, अन्नधान्य पासून सर्व. आत्ता नुकत्याच शाळा सुरू झाल्या त्यांना सुद्धा सॅनिटायझर मशीन देण्यात आल्या. स्वतःचे अपयश लपविण्यासाठी कोणतेही आरोप करत बसने यासाठी आमदार प्रयत्न करत आहेत ते चुकीचे आहे. आपला व्यवसाय दोन नंबरचा असे बोलले जाते, त्यामध्ये आपण देशात दारूचा महापूर होतो त्यात आपण रसायन पुरवता अशा प्रकारची चर्चा आहे. हजारो लाखो लोकांचे घर उध्वस्त करून पैसे कमविणे आणि वरून साधू संतांचा आव आणून वागणे. ही तुमची वस्तुस्थिती आहे. माथाडी कामगारांवर बोलण्याचा आपल्याला अधिकारच नाही. जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळी या किती कामगार आ. शशिकांत शिंदे साहेबांच्या पाठीशी आहेत ते दाखवू. हे क्षणात मिळालेले नाही, तर अनेक वर्षाच्या लोकांची कामे करून, चळवळ उभी करून कमावले आहे. म्हणून महाराष्ट्रात लाखो लोक माझ्या आमदाराच्या पाठीशी आहेत. तुम्ही किती घोटाळे केले हे लवकरच आम्ही लोकांसमोर जाहीर करू. दुसऱ्याला उपरे बोलताना आपण स्वतः ब्राझील ला पळून गेला होता त्यावेळी कोणाच्या संपर्कात होता ? 


एक वर्षात मतदार संघात कोणते मोठे काम आणले? प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांची कामे ही आमच्या आमदारांनी करून दाखवली आहेत. स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी धडपड करत लोकांवर आरोप करायचा असा प्रयत्न करून पळ काढण्याचा प्रयत्न करू नका.

No comments