Header Ads

सातारा शहराच्या प्रवेशद्वारांना मराठा सरदारांची नावे द्या; युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांचे पालिकी प्रशासनास निवेदन satara


सातारा
: सातारा शहर अर्थात शाहूनगरी या नगरीला तीनशे वर्षाचा ऐतिहासिक वारसा आहे. या नगरीच्या प्रवेशद्वारांना शिवकाळातील प्रसिद्ध मराठा सरदारांची नावे देण्यात यावीत अशी मागणी युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी निवेदनाद्वारे केली. संग्राम बर्गे यांनी गुरुवारी सकाळी पालिकेत येऊन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना निवेदन सादर केले. यावेळी गणेश जाधव, धनंजय पाटील, अभिजीत बारटक्के, बापू ओतारी आदि उपस्थित होते.

संग्राम बर्गे यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या ऐतिहासिक शाहूनगरीला तीनशे वर्षाची परंपरा आहे. हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत नरवीर तानाजी मालुसरे, मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासारख्या अनेक मराठा सरदारांनी योगदान दिले आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आजच्या पिढीला माहित व्हावा यासाठी मोळाचा ओढा, वाढे फाटा, कोल्हापूर फाटा, बोगदा, अजंठा चौक इं ठिकाणी स्वागत कमानी उभारून त्याला मराठा सरदारांची नावे देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान संग्राम बर्गे यांनी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना भेटून या संदर्भात चर्चा केली. खा.उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार अशा स्वागत कमानींचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्षांनी चर्चेदरम्यान दिली.

No comments