Header Ads

ल्हासुरणे येथे महिलांनी एकत्रित येऊन साजरी केली शिवजयंती; हळदी-कुंकू, स्नेह भोजन कार्यक्रमांचेही आयोजन satara


कोरेगाव
: ल्हासुरणे ता. कोरेगाव येथे सर्व जाती-धर्मातील महिलांनी एकत्रीत येऊन शिवजयंती उत्साहात साजरा केला. दरम्यान यावेळी शिवजयंतीनिमित्त हळदी-कुंकु, स्नेह भोजन कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला. शिवजयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लासुर्णे महिला आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती निमित्त प्रथमच हळदी कुंकू कार्यक्रम पार पाडून नवा संदेश दिला. सर्वच जाती धर्मातील महिलांनी एकत्र येऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पाडला रांगोळी काढून महाराजांच्या मूर्तीचे पूजन केलं. पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलन केले. सर्वांमध्ये मोठा उत्साह व आनंद होता ज्या पद्धतीने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो त्याच पद्धतीने आम्ही शिवजयंती सुद्धा साजरी करतो असाच संदेश बौद्ध धर्मातील महिलांचा यावेळी दिसला. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या सुप्रियाताई सावंत उपस्थित होत्या. त्यांनीही महिलांना संघटन बांधणी याविषयी मार्गदर्शन केले. एकीचे बळ किती मोठं असतं हे सुप्रिया सावंत यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितल या कार्यक्रमासाठी रोहिणी उबाळे यांनी पुढाकार घेतला व सर्व महिलांना एकत्र आणलं. कार्यक्रमासाठी सौ.रत्नमाला उबाळे सौ.सावित्री उबाळे सौ.अनिता उबाळे व सर्व उबाळे, इंगळे महिला वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाचे संयोजक रमेश उबाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग यांनी केले होते. सर्व महिलांनी रमेश उबाळे हे या कार्यक्रमाचे संयोजक होते अतीशय कल्पकतेतुन त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानून कौतुकही केले. शिवजयंतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम सस्नेह भोजन अशा पद्धतीचा कार्यक्रमाचे स्वरूप होते. तसेच यावेळी सर्व महिला वर्गाने रमेश उबाळे यांना पुढील सामाजिक कार्य व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

No comments