Header Ads

छ.शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कोरेगाव तालुका युवती आयोजित स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबीरास विद्यार्थीनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद satara


कोरेगाव
: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोरेगाव तालुक्यातील विद्यार्थीनींसाठी संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे, कार्यसम्राट आमदार विधानपरिदषदेचे सदस्य शशिकांतजी शिंदे, व युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबीराचे आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेस कोरेगाव तालुका अध्यक्ष अश्विनी कदम, उपाध्यक्ष कोमल घोरपडे, सरचिटणीस डाॅ. भाग्यश्री कणसे यांनी केले होते. तालुक्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयात स्व-संरक्षण शिबीराचे आयोजन करण्याचा मानस राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा आहे.


या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती सौ. वैशालीताई शशिकांतजी शिंदे, अध्यक्षा सार्थक महिला बचत गट फेडरेशन, तसेच राष्ट्रवादी महिला आघाडी कोरेगाव तालुका अध्यक्षा प्रतिभा बर्गे, उपनगराध्यक्ष नगरपंचायत कोरेगाव मंदा बर्गे, पंचायत समिती सदस्या सुप्रिया सावंत, जागृती महिला मंडळ अध्यक्ष वंदना शिंदे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस सचिव स्मिता देशमुख, जिल्हा अध्यक्ष पुजा काळे, कन्या शाळा व सरस्वती विद्यालयच्या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते. 


याप्रसंगी बोलताना सौ. वैशालीताई शिंदे यांनी शिवकालीन स्व-संरक्षणासाठी वापरात येणार्या तलवारबाजी, भाला, लाठी अशा युद्धकलांची आठवण करून दिली. युवती व महिंलावर अन्याय व अत्याचार होऊ नये, रयतेचे रक्षण करण्याची शिकवण राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना दिलीय. आजच्या काळात शिवरायांचे विचार व गुण अंगी बाणण्याची, त्यांचा इतिहास जपण्याची व शिवरायांचा आदर्श डोळयांसमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची गरज तसेच युवती व महिलांनी सक्षम राहणे व स्व-संरक्षण करणे हीच खरी छत्रपतींची शिवजयंती... तसेच युवती व महिलांनी छेडछाड, अन्याय, अत्याचाराला विरोध करण्यासाठी सक्षम राहिला पाहिजे आणि स्व-संरक्षण कला शिकण्याच तंत्र अवगत केला पाहिजे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.


एकदिवसीय कार्यशाळेतून मुलींना विनाकारण कोण त्रास देत असेल, त्यांची छेडछाड करत असेल तर त्यांना विरोध करून स्वतःचा बचाव करण्यासाठीच योग्य मार्गदर्शन प्रशिक्षणा दरम्यान देण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू व कराटे चॅम्पियन्स सानिया शिकलगर व रुकैया शिकलगर यांच्या माध्यमातून स्व-संरक्षणाच्या विविध टेक्निक व किक्सच्या प्रकारांचा लाभ सर्वांनी घेतला.

No comments