Header Ads

सहाय्यक आयुक्तांच्या खुर्चीला गुटख्या पुड्यांचा हार; संपूर्ण गुटखा विक्री बंद न झाल्यास धरणे आंदोलनाचा ‘आप’ने दिला इशारा satara


सातारा
: अवैध गुटखा निर्मिती तसेच जिल्ह्यात संपूर्ण गुटखा विक्री बंद करण्यात यावी. अन्यथा दि. 1 मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी दिला आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्तांच्या खुर्चीला गुटखा पुड्यांचा हार घालण्यात आला.  याबाबत अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  संपूर्ण राज्यात गुटखा बंदीचा स्तुत्य निर्णय शासनाने घेतला असला तरी या निर्णयाची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. आपल्या कार्यालयामार्फत जिल्ह्यामध्ये गुटखा निर्मिती व विक्री यावर ज्या पध्दतीने कारवाई व्हायला पाहिजे त्या पध्दतीने होताना दिसून येत नाही. केवळ जुजबी व कागदोपत्री कारवाई केल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये सातारा एम.आय.डी.सी. मध्ये देखील गुटखा निर्मिती केली जात आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये राजरोजसपणे गुटखा विक्री होत आहे.

कोरोना काळात देखील नागरिकांचे तोंडामध्ये गुटखा दिसत आहे व यामुळे संपुर्ण टिकाणी अस्वच्छता होत आहे. बरेच तरूण या व्यसनामुळे कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासले आहेत. ही अतिशय गंभीर बाब असूनही आपले प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करित आहे. त्यामुळे जन माणसामध्ये आपले कार्यालयाचा व संबंधीत गुटखा उत्पादकामध्ये काही आर्थिक हितसंबंध आहेत की काय? अशी भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे गुटखा निर्मिती व त्याचे रोजरोसपणे विक्री होताना दिसत आहे. मात्र आपणाकडून केवळ किरकोळ पानटपरीवरील विक्रेते यांचेवरच कारवाई होताना दिसून येत आहे. वास्तविक आपले विभागाकडून संबंधीत गुटखा निर्मिती करणारे उत्पादक, त्यांचे डिलर यांचेवर प्राधान्याने कारवाई करणेत यावी ही आमची आग्रही मागणी आहे. यावर आपले प्रशासनाकडून येत्या 15 दिवसामध्ये कोणतीही ठोस कारवाही न झालेस याचे निषेधात 1 मार्च पासून लोकशाही मागनि जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचे कार्यालयासमोर बेमुदत धरणे/ उपोषण करणेत येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली व आपले प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी, असाही इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते महेंद्र बाचल, तात्या सावंत, संदिप माने, अजय जाधव, रोहित साळुंखे, प्रथम साळुंखे, विजयकुमार धोतमल, रजत चव्हाण, गौरव औताडे आदींची उपस्थिती होती.

No comments