Header Ads

गवई साहेबांच्या वाढदिवसाला आनंदली आदिवाशी मुले; R.P.I.च्या सातारा जिल्हाने छोट्या शिशिरच्या हस्ते केले फळ वाटप satara


सातारा
: नुकतेच कोरोनावर यशस्वी मात केलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीयनेते, बहुजन हृदयसम्राट मा.डॉ.राजेंद्र गवईसाहेबांचा ५ फेब्रुवारीचा वाढदिवस राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने साजरा होत असताना सातारा जिल्ह्याने मात्र वाढदिवसात समाजकार्य जोपासल्याने त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. डॉ.राजेंद्र गवई कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये थोडे चिंतेचे वातावरण होते. मात्र कालच साहेबांनी कोरोनावर मात करुन घरी परतल्याने हजारो पदाधिकारी कार्यकर्त्याना हायसे वाटले. शांत, संयमी ,अभ्यासू लढवय्ये नेते म्हणून अवघा महाराष्ट्र त्यांचेकडे आदराने पाहतो. सत्तेच्या सारीपाटाला दुर लोटून समाजाच्या व्यथा आणि वेदनांशी घट्ट नाळ जोडलेल्या या नेत्याचा ५ फेब्रुवारीला सर्वत्र वाढदिवस साजरा होत असताना पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय गाडे (तात्या), जिल्हा महासचिव सुहास मोरे यांनी आदिवाशी मुलांशीच हितगुज करणेचा निर्णय घेतला. केळी, सफरचंद, संत्री, बिस्केट, केक याची मेजवाणीच आदिवाशी लहानग्या मुलांना मिळाल्याने ती आनंदून गेली. " साहेब " नावाचा केक कापताच टाळ्याच्या गजरात सर्वानींच अभिष्टचिंतन केले.


दरम्यान, रिपाईचे सातारा जिल्हा महासचिव सुहास मोरे यांचे सुपुत्र शिशिरचा वाढदिवस ही ५ फेब्रुवारी असल्याने दुग्धशर्कराचा योग समजून "साहेब" नावाचा केक शिशिरने कापून आनंद व्यक्त केला. सदर कार्यक्रम रिपाईचे आदिवाशी आघाडी जिल्हाध्यक्ष शंकर उईके यांचे नियोजनाखाली पार पडला. कुमार शिशिरला कांबळे - गाडे यांनी शाल शुभेच्छा सह "लोकशाहीर आण्णाभाऊ साठे" हे पुस्तक भेट दिले. कार्यक्रमास दिपक कांबळे व इतर उपस्थित होते.

No comments