Header Ads

सातारा जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नरेश देसाई यांची निवड patan


पाटण
: पाटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, व तालुक्यातील हूंबरळी गावचे सुपुत्र नरेश देसाई यांची सातारा जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली असून त्यांचे निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. नरेश देसाई यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याचे पत्र आले असून, या निवडीचे पत्र काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांच्या हस्ते व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.सुरेशराव जाधव, कार्याध्यक्ष विजयराव कणसे, प्रदेश प्रतिनिधी हिंदूराव पाटील, युवा नेते उद्यसिंह पाटील- उंडाळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले.


सातारा जिल्हा काँग्रेसमधून अनेक नेते पक्ष सोडून गेले, जिल्ह्यात आणि तालुक्यात पक्षाची दयनीय अवस्था असताना पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणारे नरेश देसाई यांची पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड केल्याने एका प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय दिल्याची भावना पाटण तालुक्यातील व जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. 

देसाई यांच्या निवडीमुळे जिल्हासह पाटण तालुक्यात काँग्रेसच्या वाढीसाठी नवे बळ मिळाले आहे. निवडीबद्दल नरेश देसाई यांचे प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, आ. पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री  नितिन राऊत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आ. विश्वजीत कदम, डॉ. सुरेश जाधव, विजयराव कणसे, हिंदूराव पाटील, उदयसिंह पाटील -उंडाळकर, अजितराव पाटील -चिखलीकर, बाबासाहेब कदम, मनोहर शिंदे, अविनाश नलावडे, प्रदिप जाधव, दत्तात्रय धनावडे आदीं मान्यवरांनी  अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

No comments