Header Ads

कोरेगांव मतदार संघातील सिमेंट काँक्रीट बंधारे व कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधणेसाठी रु. १६ कोटी ७९ लाखाचा निधी : शशिकांत शिंदे koregon


कोरेगांव
: कोरेगांव विधानसभा मतदार संघातील कोरेगांव व खटाव तालुक्यातील खालिल गावांमध्ये सिमेंट बंधारे व कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधणेसाठी आ. शशिकांत शिंदे यांचे प्रयत्नातुन महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद यांचेमार्फत रक्कम रु. १६ कोटी ७९ लक्ष निधी मंजुर करण्यात आला आहे. कोरेगव खटाव तालुक्यातील काही गावे कायमस्वरुपी दुष्काळी असल्याने त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीमध्ये पावसाची अनियमीतता असल्याने रातत टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम सार्वजनीक पाणी पुरवठा योजनेनर झाला आहे. अशा परिस्थीतीवर मात करणेसाठी तसेच दुष्काळग्रस्त गवातील टंचाई कायमनी हदपार करणेसाठी गावांमध्ये जलसंधारणा अंतर्गत सिमेंट बंधारे ,कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधल्याशिवाय गत्यंतर नाही असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र जलसंधारण मह्यमंडळ औरंगाबाद यांचेमार्फत नुकतेच भडळे-१, कवडेवाडी, मध्वापुरवडी. पळशी नं.१ धबधबी, पळशी नं.२ बागेचा ओढा , पडळी नं.१ बाबाचीवाडी स्मशानभुमी, पाडळी नं.२चव्हाण ओढा , पाडळी नं ३ चिलबनेश्वर मंदिर, बोधेवाडी काळा डोह, धुमाळवाडी, गोडसेवाडी, कठापुर नं.१ , कठापुर नं.२, भोसे बाबरवस्ती, भोसे नं.२, कुमठे नं.१, कुमठे नं.२ , चिमणगाव नं. १ कुंभारवाडा , चिनणगांव नं.२ संजय मोरे याचे विहरीजवळ , चिमणगांव नं.३ फरशी ओढा , सांगवी नं १ रांजण ओढा , सांगवो नं.२ हरणाचा डोह , कोरेगांव पड नं.१ , कोरेगांव पड नं.२ , भाकरवाडी दुधाणी , तडवळे नं.१ , तडवळे नं.२ खरात नाना , जांब बु. वरळी ओढा, कोरेगांव मळवी, कोरेगांव विसवा , कोरेगांव गोल डगर, बोबडेवडी , चांदवडी , तडवळे येथे सिमेट काँकीट बंधारे बांधणेसाठी रवकम रु.१० कोटी ३ लक्ष तसेच ल्हासुर्णे नं.२, शिरढोण , जळगांव (जांबुळ बेट), तडवळे सं कोरेगाव, कुमठे , अंबवडे येथे कोल्हपुर पध्दतीच्या बंधाऱ्यांसाठी रक्कम रु ४ कोटी ९३ लक्ष तसेच खटाव तालुक्यात मोळ उतरण शेत, मोळ नांगरे मळा, मोळ भोडसे शेत, नांजरवाडी निलाव शेत , ललगुण मौलाई ओढा -फडतरे मळा, ललगुण येरळा नदीवर (दहीभात), ललगुण मौलाई ओढयावर बबन फडतरे व अशोक फडतरे , ललगुण सोन्याचा ओढा, अनपटवाडी येथे सिमेंट काँकीट बंधारे बांधणेसाठी रक्कम रु. १ कोटी ८२ लक्ष असे एकुण रु. १६ कोटी ७९ लक्ष सिमेंट कांक्रीट बंधारा व कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधणेसाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ

औरंगाबाद यांचेकडुन मंजुर करणेत आले आहेत. सदर ठिकाणी बंधारे बांधल्यानंतर पाणी टंचाई निवारण्यासाठी मदत होणार आहे. तसेच लवकरच निविदा प किया होऊन कामस सुरवात होणार आहे. कामे कोरेगांव विधानसभा मतदार संघातील विकासकामांसाठी मी प्रयत्नशिल असुन भनिष्यातही मतदार संघाच्या विकासासाठी विविध योजनेतुन निधी आणण्यासाठी आपण कटीबध्द आहोत उर्वरीत विकासकामे पुर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

No comments