Header Ads

जनता सहकारी बँकेच्या महिला संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी डॉ. शितल बेबले satara


सातारा
: कामाच्या ठिकाणी महिलांच्या अडीअडचणी, तक्रार निवारणासाठी अधिनियम 2013 अंतर्गत महिला संरक्षण समिती करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्हा आणि तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँकेमध्ये नवीन कर्मचारी भरतीनंतर महिला कर्मचा-यांची संख्या जास्त झाल्याने महिला संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी बँकेच्या सेवेत नाही परंतु सामाजिका कार्यात अग्रेसर असणा-या  एका महिलीचे निवड व्हावी असे एकमत झाल्याने या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. शितल चंद्रकांत बेबले यांची एकमताने निवड करण्यात आली. 

जनता सहकारी बँकेत ऑगस्ट 2019 मध्ये फक्त 5 महिला सेविका कार्यरत होत्या. सप्टेंबर 2019 मध्ये बँकेत झालेल्या ऑनलाईन नोकरभरतीव्दारे एकूण 30 महिलांना बँकेच्या सेवेत नियुक्ती व अनुकंपा तत्वाखाली 1 महिला नियुक्त झाली. महिलांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांचे प्रश्न, अडीअडचणी मांडण्यासाठी महिला संरक्षण समिती नियुक्तीबाबत बँक व्यवस्थापनाने विचार केला. त्यानुसार मासिक सभेत विषय मांडला आणि त्यास मंजुरी घेऊन बँकेतील सर्व महिला कर्मचारी व अधिका-यांना महिला संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी आवश्यक अध्यक्ष व 4 महिला सदस्यांची निवड करण्याबाबत कळवले. त्यापैकी बँकेच्या सेवेत नाही परंतु सामाजिक कार्यात अग्रेसर असणा-या एका महिलेची निवड करण्याबाबत कळवले. बँकेतील सर्व महिलांनी याविषयी सभेचे आयोजन केले व महिला सेवक, अधिकारी यांनी सभेमध्ये एकमताने अध्यक्ष व चार महिला सदस्यांची नावे बँक व्यवस्थापनास कळवली. त्यानुसार महिला संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी डॉ.शितल चंद्रकांत बेबले यांची व सदस्यपदी बँकेतील महिला अधिकारी श्रीमती संगिता राजेंद्र टिळेकर, महिला सेविका श्रीमती निलिमा गुरुदत्त पवार, सौ. मिनल अक्षय भोसले व सौ. पदमजा प्रशांत कणसे यांची निवड केली.

डॉ. सौ. शीतल बेबले या स्वतः डॉक्टर असून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. त्या नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. महिला संरक्षण समितीची निवड झाल्यानंतर त्यास सभेची मंजुरी घेण्यात आली. त्यानंतर संचालक मंडळ आणि बँक व्यवस्थापनाच्यावतीने महिला संरक्षण समिती अध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना बँकेचे भागधारक पॅनेलचे प्रमुख व संचालक विनोद कुलकर्णी म्हणाले, बँकेत महिलांचे प्रमाण जास्त असल्यामुळे, त्यांच्या अडीअडचणी, प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता महिला संरक्षण समिती स्थापन करणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे संचालक मंडळ सभेने याबाबत योग्य निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी डॉ. सौ. शितल बेबले व सर्व महिला सदस्यांना त्यांच्या नियुक्तीबद्दल व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बँकेतील प्रत्येक महिला अधिकारी व कर्मचा-यांना काही प्रश्न, तक्रारी उदभवल्यास त्याची सोडवणूक ही महिला संरक्षण समिती नक्की करेल याची खात्री असल्याचे सांगितले. यावेळी बँकेचे चेअरमन अतुल जाधव, संचालक वजीर नदाफ, व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, उपव्यवस्थापक मच्छिंद्र जगदाळे, संजय तावरे, सेवक संचालक अनिल जठार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

No comments