Header Ads

मोळाचा ओढा येथील अतिक्रमित रस्ता संजय पाटील यांनी स्वखर्चाने केला सर्वांसाठी खुला satara


सातारा
: मोळाचा ओढा चौक येथील बेंद्रे मटण शाॅपच्या पाठीमागील गेले 40 वर्षे लोकांच्या वापरातील रस्ता हा गेले चार पाच महिने बंद करण्यात आला होता, सदर रस्ता आझाद नगर, गंगासागर काॅलनी, चिंतामणी सोसायटी, ओंकार सोसायटी अशा अनेक सोसायटी मधील नागरिक वापरत होते. सदर रस्ता बंद झाल्यामुळे या सर्व नागरिकांची गैरसोय होत होती, या सर्व नागरिकांना संजय पाटील यांनी आश्वासन दिले होते की, रस्ता खुला करून घेतो पण सध्या हद्दीवाढीमुळे नगरपालिका हे काम नक्की कधी करेल हे समजत नसल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून श्री संजय पाटील यांनी ज्यांनी रस्ता बंद केला त्यांच्याशी चर्चा करून हा रस्ता स्वखर्चाने अतिक्रमण काढून व पाईप टाकून सर्व नागरिकांसाठी खुला केला आहे. सदर रस्ता बंद करणार्-या लोकांशी चर्चा करायला श्री संजय पाटील, श्री गणेश आरडे, सौ मुग्धा पुरोहित, श्री मंदार पुरोहित व मोळाचा ओढा येथील ग्रामस्थ उपस्थित होते. सदरचे काम दिनांक २७ जानेवारी रोजी पूर्ण झाले. हे काम करून घेताना श्री अरूण घाडगे, श्री उमेश साळुंखे, श्री सर्जेराव शेलार, श्री इमाम शेख, श्री धनंजय इंगवले, श्री नासीर सय्यद, श्री सिकंदर पाटोळे, श्री दिपक घाडगे, श्री नरेश परदेशी, श्री बंडू किर्दत आणि इतर नागरिक उपस्थित होते.

No comments