Header Ads

गोवे ग्रामपंचायतीवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाचा झेंडा; भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने विरोधी पॅनेलचा ११- ३ उडवला धुव्वा satara


सातारा
: सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाची आणि मोठी ग्रामपंचायत असलेल्या गोवे ग्रामपंचायतीवर आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद सत्ता मिळवली. आमदार गटाच्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने विरोधी परिवर्तन रयत पॅनेलचा ११-३ या फरकाने धुव्वा उडवला. ग्रामपंचायत निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे मीना जमदाडे, वर्षा भोसले, योगेश जाधव, कमल चावरे, कविता जाधव, तुकाराम चावरे, पूजा रणशिंगे, विवेक जाधव, राजेश भोसले, विठ्ठल लोहार, अर्चना जाधव हे उमेदवार विजयी झाले.

विजयी उमेदवारांचा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी  पॅनेलप्रमुख जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. लता जाधव, सचिन हंबीरराव जाधव, विवेक विलासराव जाधव, सदाशिव बागल यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी गावाचा सर्वांगीण विकास करा. ग्रामस्थांना अपेक्षित विकास कामे करून आदर्श गाव निर्माण करा. यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करू, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले.

No comments