Header Ads

आदर्श चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद : खा.उदयनराजे satara


सातारा
: समाजात विविध सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर राहणाऱ्या सातारा शहरातील आदर्श चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. मा.नगरसेवक प्रशांत आहेरराव व आदर्श चॅरिटेबल ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन खा.उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी दादा आहेरराव, सुरेश महाडिक, किरण राजेमहाडिक, सयाजीराव संकपाळ, मोरेश्वर मारुलकर, विजय तावडे, किशोर शिंदे, सुनील काटकर, सुधीर साखरे, सूर्यकांत निगडे, बाळासाहेब आहेरराव तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदर्श चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक प्रशांत आहेरराव मित्र समूहाच्या वतीने रक्तदान, वृक्षारोपण, दरवर्षी लोणंद येथे वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप, प्रभागात वाचनालय, व्यायामशाळा, प्रभागातील सांस्कृतिक कार्यालयात सामाजिक उपक्रम, प्रभागात व परिसरात कोरोना काळात मोफत सॅनिटायझेशन, कोरोना योध्याचा सन्मान, सॅनिटायझर व मास्क वाटप यांसह अनेक उपक्रम खा.उदयनराजेंच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टच्या माध्यमातून राबिवले जात असल्याचे मा.नगरसेवक प्रशांत आहेरराव यांनी सांगितले.

No comments