Header Ads

श्री.शिवाजी विद्यापिठाचे उपकेंद्र होण्यासाठी खावली येथील ७८ गुंठे जमिन वर्ग करा : खा.उदयनराजे satara


सातारा
: श्री.शिवाजी विद्यापिठाचे उपकेंद्र होण्यासाठी खावली येथील ७८ गुंठे जमिन वर्ग करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री.शेखर सिंह यांचेकडे खा.उदयनराजे भोसले यांनी आग्रहपूर्वक मागणी केली आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री.शेखरसिंह यांची भेट घेवून, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वस्तुस्थिती नमुद करताना विषद केले की, श्री शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे सुरु करण्यास विद्यापीठाने तत्वतः मान्यता दिली आहे, खावली येथील संभाव्य उपकेंद्राच्या जागेची तत्कालीन कुलगुरु यांचेसह आम्ही पहाणी देखिल केली आहे. सातारचे उपकेंद्र सुरु करण्याचाचत श्री शिवाजी विद्यापीठाची सर्व तयारी आहे. नजीकच्या काळात जागा उपलब्ध झाल्यास पहिल्यांदा शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र आणि त्यानंतर स्वतंत्र सातारा विद्यापीठ निर्माण होईल आणि जिल्हयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक लाभाकरीता एक चांगली संधी निर्माण होणार आहे. म्हणूनच विद्यार्थ्याच्या हितास प्रथम प्राधान्य दिले पाहीजे. शैक्षणिक बाब असल्याने, या उपकेंद्रास प्राधान्याने खाबलीची जागा दिली पाहीजे असे विविध दाखले देत अभ्यासपूर्ण मत मांडले. याकामी एरिगेशन विभागाला जागा पाहीजे असेल तर तेही महत्वाचे आहे. त्याकरीता वेगळा पर्याय काढावा व उपकेंद्राकरीता खावली येथील जागा विनाविलंब उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात यावी असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मताशी सहमती दर्शवत, जागेचा प्रस्तावावर सर्व बाजु तपासून सकारात्मकतेने निर्णय घेतला जाईल असे ठोस आश्वासन दिले. या भेटी वेळी शिवाजी विद्यापीठाचे सिनेट प्रतिनिधी अमित कुलकर्णी, नगरसेवक व सिनेट प्रतिनिधी श्री.डि.जी.बनकर, रॉबर्ट मोझेस, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी यांचे दालनातुन बाहेर पडल्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रसारमाध्यमांनी बोलण्यास सांगीतल्याने, तेथेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विविध विषयावर दिलखुलास मते व्यक्त केली.

No comments