Header Ads

कोविड संसर्ग प्रतिबंधक लस विधान परिषद सभापती, पालकमंत्री व गृहराज्यमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थित जिल्ह्यात विविध ठिकाणी होणार शुभारंभ satara


सातारा
: कोविड संसर्ग प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून 16 जानेवारीपासून लस देण्यात येणार आहे.  याचा  जिल्ह्यात शुभारंभ कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तर उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या  प्रमुख उपस्थित शुभारंभ कार्यक्रम होणार आहे. उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निबाळकर, आमदार दिपक चव्हाण, ग्रामीण रुग्णालय पाटण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे, ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे आमदार जयकुमार गोरे,खंडाळा आणि  मिशन हॉस्पीटल, पाचगणी   येथे आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थित शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली.

No comments