Header Ads

सातारा, जावळी तालुक्यातील बहुताऊंश ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाचे वर्चस्व; विजयी उमेदवार, कार्यकर्त्यांची 'सुरुची'वर गुलालाची उधळण satara


सातारा
: सातारा आणि जावली तालुक्यातील बहुताऊंश ग्रामपंचायतीवर आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवादीत सत्ता मिळवली. मतदानापुर्वीच काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या तर उर्वरीत ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले. मतमोजणीनंतर सातारा आणि जावली तालुक्यातील ग्रामपंचायतीवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाने सत्ता प्रस्थापित केली असून काही ग्रामपंचायतीमध्ये विरोधी गटाला एकही जागा मिळाली नाही. विजयानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाच्या विजयी उमेदवारांसह हजारो कार्यकर्त्यांनी सुरूची या निवासस्थानी जावून गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच गावचा सर्वागिण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू असे आश्वासनही दिले.

सातारा तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींची निवडूणुक लागली होती. प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. १३० पैकी 37एवढ्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ग्रामपंचायतींची शुक्रवार दि. १५ रोजी अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निकाल जाहिर होताच विजयी उमेदवार, पॅनेल प्रमुख आणि कार्यकर्ते हळूहळू सुरुची या निवासस्थानी गोळा होवू लागले. निकाल जाहीर होताच त्या- त्या गावातील शेकडो लोक गुलालाची उधळण करत आ. शिवेंद्रराजे यांचा जयजयकार करत सुरुची निवास्थानी दाखल होत होते. सुरुची येथे जोरदार घोषणाबाजी करून एकच जल्लोष केला जात होता. 

सातारा तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या शेंद्रे (८-०),कोंडवे (१०-३), नागठाणे (१७-०), कळंबे (९-०), किडगाव (९-०), ठोसेघर (७-०), बोरगाव (११-०), परळी, सासपडे, नुने (४-३), डोळेगांव (५-२), शिवाजीनगर, कुमठे (७-०), वाढे (६-४), राकुसलेवाडी (५-०), सारखळ (५-२), नेले (५-२), पिलाणी (४-३), शिवाजीनगर, शेळकेवाडी, करंडी, परमाळे (४-३), काळोशी (५-२), वळसे, वेणेगाव, अंगापूर, कुसवडे (५-४), वर्ये, लावंघर, आरे, दरे, वनगळ,मापरवाडी,  वेचले, नागेवाडी, कण्हेर, आगुंडेवाडी, अहिरेवाडी आदी बहुताऊंश सर्वच ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने झेंडा फडकावला.

जावली तालुक्यात आमदार गटाचाच झेंडा 

सातारा तालुक्याप्रमाणेच जावली तालुक्यातही सर्वच ग्रामपंचायतींवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने वर्चस्व निर्माण केले. जावली तालुक्यातील ७५ पैकी ३७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. या सर्वच ग्रामपंचायती आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विचाराच्या आहेत. ३८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले असून आज निकाल जाहीर झाला. तालुक्यातील सर्जापूर, सरताळे, कुडाळ, महिगाव, सनपाने, आलेवाडी, दरे बु., धोंडेवाडी, करंदोशी, काटवली, हातगेघर, पिंपळी, वहागांव, जरेवाडी, कोलेवाडी आदी ग्रामपंचायतीवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने बाजी मारली.संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहुलेल्या कुडाळ ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या लढतीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे कट्टर समर्थक सौरभ शिंदे यांच्या रयत पॅनेलने ७, विरेंद्र शिंदे यांच्या पॅनेलच्या ४ जागा निवडून आल्या. विरोधी महाविकास आघाडीला ४ जागा मिळाल्यामुळे या ग्रामपंचायतीवरही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसलेगटाने सत्ता मिळवली. बामणोली कोयना विभागात आमदार गटाने ९ पैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध करून आदर्श निर्माण केला आहे. येथील बामणोली, शेंबडी, मुनवाले, कारगाव, उंबरी, आपटी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. कास, निपाणी, वेळे ढेंन याही ग्रामपंचायतीवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने वर्चस्व मिळवले आहे. 

सुरुची येथे कार्यकत्यांनी दिवसभर  गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि स्व. अभयसिंहराजे भोसले यांचा जयघोष करुन सारा परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे राजवाडा ते शाहपूरी या मार्गावर काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

No comments