Header Ads

चौथ्या टप्प्यातील कॅन्सरवर २० वर्षीय तरूणाची जिद्दीने मात; ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये टेस्टिक्युलर कॅन्सरवर यशस्वी उपचार satara


सातारा
: सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय एका तरूणाने इच्छाशक्तीच्या बळावर शेवटच्या टप्प्यातील कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली आहे. त्याला झालेल्या कर्करोगाचे नाव टेस्टिक्युलर कॅन्सरअसून तो चौथ्या स्टेजवर होता. साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये या तरुणावर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे या तरुणाला नवीन आयुष्य मिळाले आहे. अमर शिंदे (नाव बदललेले आहे) असं या तरूणाने नाव आहे. लघवीच्या खालील भागात सूज आल्याने हा तरूण उपचारासाठी आला होता. वैद्यकीय तपासणीत या तरुणाला  टेस्टिक्युलर कॅन्सर हा कॅन्सर असल्याचं निदान झालं. हा कॅन्सर शेवटच्या टप्प्यात होता. मुळात, कॅन्सरचं अचुक निदान व उपचार झाल्यास रूग्ण बरा होऊ शकतो. परंतु, चौथ्या टप्प्यातील कॅन्सर रूग्णाचा जीव वाचवणं अवघड असते. परंतु, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमधील मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट (केमोथेरपी,टार्गेटेड थेरपी,इम्यूनोथेरपीतज्ञ ) डॉ. दत्तात्रय अंदुरे यांनी हे कठिण आव्हान स्विकारले. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे हा तरूण कर्करोगमुक्त झाले असून त्याला नवीन आयुष्य मिळाले आहे.

ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमधील मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट  डॉ. दत्तात्रय अंदुरे म्हणाले की, ‘‘लघवीच्या खालील भागात सूज आल्याने हा तरूण उपचारासाठी आला होता. वैद्यकीय तपासणीत त्याला  टेस्टिक्युलर कॅन्सर  असल्याचे निदान झाले. भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला याच प्रकारचा कॅन्सर   होता. असाच कँन्सर या तरुणाला झाला असल्याचे समोर आले. कुटुंबियांच्या परवानगी नुसार या तरुणावर उपचार करण्यात आले. चार किमोथेरपी देण्यात आले. त्यानंतर पेटस्कँन चाचणी करण्यात आली. या चाचणीत अंडाशय येथे कँन्सरची गाठ अजून असल्याचे निदान झाले. त्यावर शस्त्रक्रिया करून ही गाठ काढण्यात आली. आणि रुग्णाला आणखीन दोन किमोथेरपी सायकल देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा पेटस्कॅन आणि रक्तचाचणी करण्यात आली. या तपासणीत तरुणाचा कँन्सर पुणँपणे बरा झाला होता. 

डॉ. अंदुरे म्हणाले की, कॅन्सर असल्याचं निदान झाल्यास अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकते. कँन्सर असल्याचे कळल्यावर लोक घाबरून जातात. लोक ते स्विकारत नाही आणि वेळीच उपचार न मिळाल्याने रूग्ण दगावण्याची शक्यता असते. परंतु,  टेस्टिक्युलर या कॅन्सरवर पटकन उपचार झाल्यास रूग्ण बरा होऊ शकतो. या तरूणाला कॅन्सर असल्याचं फार उशीरा निदान झालं. पण या तरूणाने आत्मविश्वासाच्या बळावर शेवटच्या टप्प्यातील कॅन्सरवर मात केली आहे. कॅन्सर असल्याचं कळल्यावर हा मुलगा खुपच घाबरून गेला होता. उपचार सुरू करण्याआधी त्याचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर अतिशय धीराने या मुलाने कॅन्सरवरील उपचार घेतले. आता त्यांची प्रकृती उत्तम असून नुकतंच त्याला घरी सोडण्यात आले आहे, असेही डॉ. अंदुरे म्हणाले. कॅन्सर "कमी वयातील तरूणामध्ये अधिक दिसून येत आहे.  या कॅन्सरचं वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण ठिक होऊ शकतो. हा कॅन्सर अंडाशयाच्या भागात  होतो. उपचार न घेतल्यास हळुहळु तो फुफ्फुस आणि मेंदूपर्य़ंत पसरतो. अशावेळी रूग्णावर उपचार करणं डॉक्टरांसाठी खूपच अवघड होतं. अवघड जागेत दुखणं, श्वास घेण्यास अडचण जाणवणं हे या कॅन्सरची प्रमुख लक्षणं आहेत. रूग्णामध्ये अशी लक्षण दिसत असल्यास तातडीने कर्करोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

No comments