Header Ads

सातारा जिल्ह्यात 9 ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक लस कार्यक्रम शुभारंभ satara


सातारा
: कोरोना संसर्गामुळे देशाबरोबर राज्याचे अर्थ चक्र थांबले. अनेकांचे प्राण गेले त्याचबरोबर सर्वांनाचा याचा त्रास झाला. आज देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे. यामुळे देशासह राज्यात आज उत्साहाचे वातरण असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थिती बाळासाहेब विष्णू खरमाटे, क्ष -किरण वैज्ञानिक अधिकारी यांना पहिली कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष माधवी कदम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य संस्था अंतर्गत कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभाग, सैन्य दल, हवाई दल व तिसऱ्या टप्प्यात सर्व सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही लस जिल्ह्यातील 9 ठिकाणी  देण्यात येणार असून या 9 ठिकाणी प्रत्येक दिवशी 100 लाभार्थ्यांनाच लस देण्यात येणार आहे. लस घेतल्यानंतर 30 मिनिटे निरीक्षणही करण्यात येणार. लसीमुळे आज आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असल्याच्या भावना पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी बोलून दाखविल्या 
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी लसीकरण प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्षाची पहाणी करुन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.  लसीकरणाचा मला आज लाभ मिळाला. त्याबद्दल मला आनंद वाटत आहे. मला कसलाही त्रास जाणवत नाही, यापुढे कोरोना मुक्तीच्या कासाठी आणखीन जोमाने काम कर, असा विश्वास जिल्ह्यातील पहिली करोना प्रतिबंधक लस घेणार बाळासाहेब विष्णू खरमाटे, क्ष -किरण वैज्ञानिक अधिकारी यांनी व्यक्त केला.

कराड येथे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शुभारंभ

उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपथित संपन्न झाला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती  फलटण येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

उपजिल्हा रुग्णालय फलटण  येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार दिपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.   या प्रसंगी  जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होत्या. 
 
 
 कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 

कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात आज कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना प्रतिबंधीक लसीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

वाई येथे आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 

धन्वंतरी पूजन आणि कर्मचाऱ्यांना लस देऊन   मिशन हॉस्पीटल वाई येथे आमदार आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना प्रतिबंधीक लसीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा डॉ.सौ. प्रतिभा शिंदे, तहसीलदार  रणजीत भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. सतीश बाबर,'निमा'चे डॉ.शेखर कांबळे, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे डॉ.शैलेश धेडे, मिशन हॉस्पिटलचे प्रशासक रॉबर्ट मोझेस, नगरसेवक भारत खामकर, सौ.वासंती ढेकाणे,रेश्मा जायगुडे,सौ रुपाली वनारसे,प्रदीप जायगुडे, लसिकरण मोहीम प्रमुख डॉ. सुधाकर भंडारे ,अजित वनारसे,डॉ. मदन जाधव, विठ्ठल भोईटे,अप्पासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

दहिवडी येथे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थिती लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 

दहिवडी ग्रामीण रुग्णालयात आज आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना प्रतिबंधीक लसीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

No comments