Header Ads

ज्या वेळी अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता, 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला? satara


सातारा
: सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, मनसे नेत्या रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर आपली भुमीका स्पष्ट केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली असतानाच, बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे. राजकारणांनो बलात्कार हे तुमच्या राजकारण खेळी बनवून नका. आणि बायांनो तुमच्या संमतीचे शाररिक संबंध हे राजकारणात कोणाला वापरून देऊ नका. तुमच्या मुळे आमच्या खरोखर पीडित बलात्कार झालेल्या अन्याय झालेल्या भगिनींला न्याय मिळत नाही. याची एक महिला म्हणून लाज बाळगा 😡 ज्या वेळी अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता, 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?. बलात्कार हा त्या महिलच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने होत असतो. संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार हा बलात्कार नसतो.

जय महाराष्ट्र,जय मनसे

ही पोस्ट मनसे नेत्या रुपाली ठोंबरे यांनी फेसबुकद्वारे केली आहे.

No comments