Header Ads

माण तालुक्यातील शिक्षकांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांबाबत शिक्षक संघाचे प्रयत्न; सोनाली पोळ यांना दिले निवेदन satara

सातारा : माण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे काही प्रश्न जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित आहेत. तरी हे सर्व प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे व्हॉईस चेअमनपद महेंद्र अवघडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समितीच्या सभापती सोनाली पोळ यांना भेटून त्यांनी सदरची विनंती केली.

यामध्ये नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्ती झालेल्या शिक्षकांची अंशदान निवृत्तीवेतन योजनेची १०% कपात रक्कम संबंधितांना मिळावी,२०१८/१९ मध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर झालेल्या शिक्षकांची फरक बिलासाठी चे अनुदान पंचायत समितीकडे वर्ग करावे,२०१९-२० या वर्षी च्या भविष्य निर्वाह निधी च्या स्लिपा मिळाव्यात,७ व्या वेतन आयोगाच्या निश्र्चितीची पडताळणी तालुका स्तरावर विशेष कॅम्प लावून करावी तसेच २०१६ ला निवृत्त झालेल्या शिक्षकांची पेन्शन ७ व्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर दाखल प्रस्ताव लवकर मंजूर करावेत अशी मागणी करण्यात आली.

सोनाली पोळ यांनी सर्व प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सुचना केली असून तसे पत्र ही यावेळी दिले आहे. यामुळे माण तालुक्यातील सदरचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे.


यावेळी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन राजेंद्र घोरपडे, जिल्हा संघाचे माजी कार्याध्यक्ष अंकुश शिंदे,कराड पाटण सोसायटीचे माजी चेअरमन संजय शेजवळ, बाजीराव शेटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments