Header Ads

अतिशय साधेपणाने लाडक्या बाप्पाचे शाहूनगरीत आगमन satara

सातारा : गणपती माझा नाचत आला…अशी धून दरवर्षी वाजत होती. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने बाप्पा अतिशय साधेपणाने आले. शाहूनगरीत तोच उत्साह, तोच आनंद मंडळाच्या कार्यकर्त्यांचा दिसत होता. गणेश भक्तांची सकाळपासून बाप्पांचे आगमन करण्याची धांदल सुरू होती. शहरातील मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी अतिशय साधेपणाने ना ढोल ना ताशा अशा स्वरूपात स्वागत केले. नगराध्यक्ष माधवी कदम यांनी घरात शाडूच्या मातीची मूर्त बसवून सकाळी विधिवत पूजन केले. पोलिसांनी आवाहन केल्यानुसार शहरात भाविकांनी सोशल डिस्टन्स ठेवून गर्दी केल्याचे दिसत होते. जिल्ह्यातील साडे तीन हजार गणेश मंडळांनी रात्री उशिरापर्यंत बाप्पांची प्रतिष्ठापना केली.


गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा घोषणा देत शाहूनगरीत बाप्पांना आणण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू होती. कोरोनाचे सावट असले तरी शहरातील सुमारे साडेतीनशे गणेशोत्सव मंडळांनी अनोख्या उत्साहात साधेपणाने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरातील मानाचा गणपती असलेला गुरुवार तालीम, शनिवार पेठेतल्या शिवपार्वती गणेश मंडळ, सोमवार पेठेतल्या आझाद मंडळ, जय जवान मंडळ या मंडळानी अतिशय साध्या पध्दतीने मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तर दरवर्षीप्रमाणे मोठी मूर्ती दर्शनासाठी ठेवली आहे. गर्दी होऊ नये याकरता काळजी घेतली जात आहे. सकाळपासून शहरातील गणेशभक्तांची बाप्पांना नेण्यासाठी मूर्ती विक्रेत्याच्या स्टॉलवर सोशल डिस्टनन्स ठेवून गर्दी दिसत होते. बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पुलाखाली मूर्तीकारांकडे ही भक्तांची गर्दी दिसत आहे.


पोलिसांचा खडा पहारा

शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी कुठे ही भाविकांकडून व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी शाहुपुरी पोलीस आणि सातारा शहर पोलीस शहरात खडा पहारा देत होते. शहरात सुमारे साडे तीनशे तर जिल्ह्यातील साडे तीन हजार मंडळांनी श्रीची प्रतिष्ठापना केली.

No comments