Header Ads

कोकणातला जैविक कचरा सोनगव कचरा डेपोत satara

सातारा : कोव्हिडं 19 चे प्रस्थ वाढत असताना सातारा शहराच्या सोनगाव कचरा डेपोत बाहेरच्या जिल्ह्यातील जैविक कचरा येतोच कसा असा प्रश्न वारंवार सातारकर नागरिकांना पडला आहे. दोन महिन्यांपूर्वी पुण्यातील जैविक कचरा सातारा शहरात आला होता. त्यावेळी उठलेले वादळ क्षमले होते. परंतु बाहेरच्या जिल्ह्यातील येणारा जैविक कचरा रोजच कचरा डेपोत येतोय त्याबाबत पालिकेचा आरोग्य विभाग डुलक्या घेत आहे. कोकणातून आलेला जैविक कचरा सोनगाव कचरा डेपोत आल्याची बाब रिपाईचे सातारा शहराध्यक्ष जयवंत कांबळे यांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणले असून त्यांनी सदरची बाब निवेदनाद्वारे प्रशासनास कळवली आहे.


सातारा शहरात सोनगाव कचरा डेपोत नेचर निड ही संस्था जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करते. जिल्ह्यातील हॉस्पिटलचा कचरा येथे असतो. शहरातून दररोज तयार होणार सुमारे सहा टन साधा कचरा हा सोनगाव कचरा डेपोत टाकला जातो. हा कचरा टाकत असताना त्यातून जैविक कचरा पडतो ती बाब वेगळीच आहे. सिव्हिलच्या कचऱ्याची समस्या कायम आहे. गत दोन महिन्यांपूर्वी लॉकडाऊन असताना पुण्यातील जैविक कचरा सातारा येथील कचरा डेपोत आला होता. तेव्हा प्रकरण एवढे वाढले होते की सत्ताधारी नगरसेवकांनी मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन दिले होते अन वातावरण निवळले होते. परंतु जैविक कचरा येणे थांबले नाही. रात्री रिपाईचे सातारा शहराध्यक्ष जयवंत कांबळे यांना याची माहिती मिळताच त्यांनी कचरा डेपोत जाऊन कचरा घेऊन येणारी गाडी अडवली व संबंधित व्यक्तींना कचऱ्याबाबत जाब विचारला. याबाबत पालिकेचा आरोग्य विभाग डुलक्या घेत असून त्यांना नेहमीप्रमाणे काहीच माहिती नव्हते. एवढेच नाही तर त्यांच्याकडून पालिकेच्या इतर पदाधिकारी यांना ही माहिती दिली जात नाही. त्यामुळे या प्रकाराची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, सातारकरांच्या जीविताशी खेळणे थांबवावे आशा मागणीचे निवेदन रिपाईचे सातारा शहरअध्यक्ष जयवंत कांबळे यांनी प्रशासनाला दिले आहे. सातारा नगर परिषेदेच्या मुख्याधिकारी यांनी संबंधित कंपनीकडून खुलासा मागीवला असून, संबंधित कंपनीकडून खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करू असे आश्वासन दिले असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

No comments