Header Ads

खेड ग्रामपंचायतीच्या शामराव माने, कांतीलाल कांबळे, शरद शेलार व वनिता ढमाळ या चार सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार satara

सातारा : सातारा तालुक्यांमध्ये राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या खेड ग्रामपंचायतीचे चार सदस्य गेल्या १३ ते १५ महिन्यापासून मासिक सभेला विनापरवानगीने गैरहजर राहिल्याने त्यांना जिप अध्यक्ष उदय कबुले यांनी नोटीस बजावणी केली असून ग्रामपंचायत अधिनियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे शामराव माने, कांतीलाल कांबळे, शरद शेलार सौ. वनिता ढमाळ या चार ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे स्पष्ट झाले असून या नोटीसामुळे खेड भागात खळबळ उडाली आहे.


सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ विना परवानगीने ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला निवडून दिलेल्या प्रतिनिधीने गैरहजर राहिल्यास त्यांना अपात्र ठरवण्याची तरतूद ग्रामपंचायत अधिनियम कलम 40 मध्ये असून जि.प. अध्यक्षांना अपात्र करण्या बाबतचे अधिकार आहेत. खेड ग्रामपंचायतीचे सदस्य शामराव माने ग्रामपंचायतीच्या १५ मासिक सभांना तर कांतीलाल कांबळे, शरद शेलार, सौ.वनिता ढमाळ हे सदस्य प्रत्येकी १३ मासिक सभांना विनापरवानगीने गैरहजर राहिले असल्याचे पंचायत समिती च्या गटविकास अधिकाऱ्यांकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम कलम 40 नुसार सदस्य अपात्र तेची कारवाई होणार असून संबंधित सदस्यांच्या मासिक सभांच्या गैरहजेरी संबंधी लेखी म्हणणे व पुरावे देण्यासाठी दहा दिवसाची मुदत जि. प. अध्यक्ष उदय कबुले यांनी नोटीस बजावणी करून दिली आहे.  त्यामुळे शामराव माने, कांतीलाल कांबळे ,शरद शेलार, सौ.वनिता ढमाळ या सदस्यांचे सदस्यत्व पद धोक्यात आले आहे.


मासिक सभांना तेरा ते पंधरा महिने गैरहजर राहून या निष्क्रिय सदस्यांनी पदाचा दुरूपयोग केला. वाँर्डातील लोकांच्या विकासकामांपेक्षा ग्रामपंचायतीची बदनामी करीत जनभावनेचा अपमान केल्यानेच त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई अटळ आहे. मतदारांनी  विचार करून या पुढे योग्य उमेदवार निवडून द्यावा व निष्क्रिय सदस्यांना घरी बसवावे.

विजय शिंदे, सरपंच खेड.

No comments