Header Ads

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वाढीव शुल्क भरू नये; शिवाजी विद्यापीठ व्यवथापन परिषदेमध्ये ठराव मंजूर : अमित कुलकर्णी satara

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेत शैक्षणिक २०२०-२१ साठी सर्व अभ्यासक्रमासाठी कोणतीही शैक्षणिक शुल्क वाढ न करता मागील वर्षीनुसार शुल्क आकारण्यात यावे, असा ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

तरी विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्ष इतकेच शैक्षणिक शुल्क भरावे व कुठल्याही प्रकारचे वाढीव शुल्क महाविद्यालयात भरू नये असे आवाहन अमित कुलकर्णी यांनी केले आहे

करोनामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांनी वाढीव शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबतचे निवेदन अमित कुलकर्णी यांना दिले होते. त्या अनुषंगाने अमित कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांना निवेदनाद्वारे व्यवस्थापन परिषदेत शैक्षणिक शुल्क वाढ रद्द करण्याचा विषय मांडला. अमित कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे कि, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची सुरुवातच कोरोनाच्या प्रादुर्भावाने आलेली असून शैक्षणिक वाटचालच अद्याप चिन्ताजनक आहे. अशा परिस्थितीत समाजातील आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली असून मोठ्या प्रमाणावर लोकांना आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात उत्पन्नाची साधने मर्यादित असल्याने समाजातील मोठा वर्ग आर्थिक विवंचनेने ग्रस्त आहे. 

शिवाजी विद्यापिठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० दरम्यान विद्यापीठाच्या कामकाजाद्वारे विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्कात काही वाढ करण्यात आलेली होती.  तत्कालीन परिस्थितीत कदाचित तो न्याय असेलही ! परंतु यंदा कोरोना कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आर्थिक कुचंबनेमुळे विद्यार्थ्यांना कदाचित मागील की इतकी रक्कम भरणेही अशक्य आहे. तरी या सर्व परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्व अभ्यासक्रमाना, शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी जेवढे शैक्षणिक शुल्क होते. तेवढेच कायम ठेवण्यात यावे.  कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त शुक्ल वाढ शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साली रद्द ठरविण्यात यावी. तसेच महाविद्यालयांना सूचित करण्यात यावे कि विध्यार्थांकडून एक रकमी शैक्षणिक शुल्काची मागणी न करता त्यांना काही सोईस्कर मुदत देण्याबाबतच्या स्थानिक पातळीवर विचार करावा,  अशी मागणी करण्यात आली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ,  कोल्हापूरच्या नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सर्व अभ्यासक्रमासाठी कोणतीही शैक्षणिक शुल्क वाढ न करता मागील वर्षीनुसार शुल्क आकारण्यात यावे,  असा ठराव करण्यात आला होता. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. अमित कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांना निवेदन देऊन व्यवस्थापन परिषदेत शैक्षणिक शुल्क वाढ रद्द करण्याचा विषय मांडला. त्यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मध्ये ३१ जुलै रोजी कुलसचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवस्थापन परिषदेत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सर्व अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क वाढ न करता मागील वर्षीनुसार शुल्क आकारण्यात यावे, असा ठराव करण्यात आला आहे.

10 comments:

 1. महाविद्यालय गेल्या वर्षी पेक्षा जास्त फी आकारत आहे

  ReplyDelete
 2. शिवाजी विद्यापीठाचे महाविद्यालय दहिवडी कॅालेज दहिवडी, ता: माण; जि: सातारा अनुदानित व विनाअनुदानित वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क मागील वर्षापेक्षा जास्त आकारत आहे कृपया यावर अंमलबजावणी करावी .........
  ही विनंती����

  ReplyDelete
  Replies
  1. कृपया याची दखल घ्यावी 🙏

   Delete
  2. कृपया यावर अंमलबजावणी करावी ....
   ही विनंती🙏🙏

   Delete
 3. दहिवडी कॉलेजन दहिवडी या महाविद्यालयाने वाढीव शुल्क बाबत घेतलेला निर्णय एकदम चुकीचा आहे..हा एक प्रकारे गरीब विद्यार्थावर केलेला अन्याय आहे...जाहीर निषेध🏴

  ReplyDelete
 4. कृपया याची दखल घ्यावी 🙏

  ReplyDelete
 5. महाविद्यालय दहिवडी कॅालेज दहिवडी, अनुदानित व विनाअनुदानित वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क मागील वर्षापेक्षा जास्त आकारत आहे कृपया यावर अंमलबजावणी करावी .........

  ReplyDelete
 6. वाढत्या फी बाबत या विषयावर आमालाबाजावणी झाली पाहिजे ..फी कमी करायला हवी -दहिवडी कॉलेज....

  ReplyDelete
 7. दहिवडी काँँलेज दहिवडी या महाविह्यालया मध्ये अनुदानित व विनाअनुदानित वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क मागिल वर्षापेक्षा जास्त आकारली आहे यावर अंमलबजावणी करावी......

  ReplyDelete