Header Ads

कोयना धरणग्रस्तांच्या पात्र खातेदारांची संख्या झाली निश्चित : डॉ.भारत पाटणकर satara

सातारा : कोयना धरण होऊन 60 वर्षाहून अधिक काळ होऊन गेला पण त्या पात्र खातेदारांची निश्चित यादी करण्यात आली न्हवती. व पुनर्वसन कायदा सुध्या अस्तित्वात न्हवता. त्या दोन्ही वेळी जेव्हा जेव्हा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे हे दोन्ही महत्वाचे निर्णय लागू झाले आहेत.

त्यामुळे गेल्या 60 वर्षाहून अधिक काळ चाललेली कोयना धरणग्रस्तची ससेहोलपट आता काही प्रमाणात कमी होणार आहे. निश्चित झालेले पात्र खातेदार व त्यातून मिळणारे पुनर्वसन संबंधीत लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या व सातत्याने चिकाटीने पाठपुराव्याने अखेर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 2वेळा व सध्याचे महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना याबाबत आंदोलनाची दाखल घेऊन कोयनेच्या प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेऊन त्यामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात भाग पाडले आहे.

श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली कोयना धरणग्रस्तांच्या विविध प्रश्न सोडवण्याचे सर्व अडथळे दूर झाले आहेत त्यामुळे  कोयना धरणग्रस्तांच्या गावा गावात जल्लोष करण्यात आला. व आपल्या हक्कची लढाईचा एक टप्प्या जिंकली असल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे अखेर श्रमिक मुक्ती दलाने रचला कोयना धरणग्रस्तांच्या सुवर्ण अक्षराने इतिहासह यावेळी  संपत देसाई, हरिश्चंद्र दळवी, चैतन्य दळवी, मालोजीराव पाटणकर ,संतोष गोटल,महेश शेलार, सचिन कदम, सीताराम पवार, बळीराम कदम, श्रीपती माने उपस्थित होते.


 कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नावर आंदोलन सुरू झाल्यावर ज्यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्नाची व्यथा जाणून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, तत्कालीन मुख्यमंत्रीचे अप्पर मुख्य प्रधान सचिव श्री .प्रवीण परदेशी, श्री भूषण गगराणी,श्री नंदकुमार काटकर,श्री रामचंद्र शिंदे, तत्कालीन अतिरीक्त जिल्हाधिकारी कै साहेबराव गायकवाड, आरती भोसले समीक्षा चंद्रकांर, श्री जगदीश निंबाळकर श्री अनिल ढिकले, श्री. सुनीलकुमार मुसळे सर्व गावचे तलाठी  मंडलाधिकारी तिन्ही तालुक्याचे तहसीलदार यांचे विशेष आभार कोयना धरणग्रस्तनी मानले.

No comments