Header Ads

मस्तवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडूच डॉक्टर पेशाला काळींबा फासण्याचे काम satara

सातारा : सातारा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून covid-19 साठी आलेल्या शासकीय निधीच्या टेंडर प्रक्रियेमध्ये शासनाकडून कुठल्याही प्रकारचे ऑडिट होणार नाही. याच गोष्टीचा फायदा उठवत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागात कोट्यवधीचा भ्रष्टाचार होत असल्याचे निवेदन रयतराज संघटनेच्यावतीने दि. ९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. त्यामध्ये आठ दिवसात टेंडर प्रक्रिया रद्द केली नाही किंवा खरेदीची जबाबदारी संबंधित ज्या-त्या विभागवार दिली गेली नाही तर जिल्हा आरोग्य विभागाला टाळे ठोक आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र शासकीय पैसा म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी समजून त्याच्यावर डल्ला मारण्याचे काम अजूनही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील काहि मोजक्या मस्तवाल अधिकाऱ्याकडून होत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये जोरदार सुरू आहे.


सध्या सर्वत्र कोविडजन्य परिस्थिती आहे. ती आटोक्यात आणण्यासाठी शासन आपापल्या स्तरावर अत्यंत चांगल्या पद्धतीने पावले उचलत आहे. नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागावर सोपवली आहे. त्यासाठी लागेल तेवढा पैसा आरोग्य विभागाकडे वर्ग केला जातोय. मात्र आणी-बाणीच्या काळात येणाऱ्या शासकीय फंडाचे ऑडिट होणार नाही याच गोष्टीचा फायदा उचलत जिल्हा परिषदचे सीईओ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी खाबुगिरीचा उच्चांक गाठला आहे. बेकायदेशीर मास्कची खरेदी केली आहे. त्यामध्ये केंद्रीय आरोग्य विभागाने मास्क खरेदी संदर्भात काही मार्गदर्शक तत्व घालून दिले होते त्या तत्वाची अक्षरशः पायमल्ली केलेली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने मास्क खरेदी करताना ते विदाऊट रेसपायरेटर असावेत असे स्पष्ट निर्देश दिलेले असताना सातारा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केंद्रीय आरोग्य विभागाकडून याबाबत सूचना आले नंतर सुद्धा 20 हजार मास्क उइथ रेस्पायरेटर खरेदी केल्याचे समोर आले आहे.त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या बदल्या ह्या नियमबाह्य केल्या असून त्यामध्ये आर्थिक तडजोड झाल्याचे पुरावे रयतराज संघटनेकडे आहेत तशी वेळ पडल्यास आम्ही पुरावे सादर करू.


ज्यापद्धतीने सातारा सिव्हिल हॉस्पिटल मध्ये भ्रष्टाचाराचा माल गोळा करणारी पाच पांडवाची टीम होती त्याच पद्धतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे हाताखाली सुद्धा हरामचा पैसा गोळा करणारी पाच पांडवाची टीम असल्यामुळेच हे सहज शक्य होत आहे. याच पाच पांडवाचा बंदोबस्त करून रयतराज संघटनेने खालील दिलेल्या मागण्या म्हणजेच मास्क, बॉडी बॅग आणि पीपीकीट यांच्या एकत्रित पाच कोटीच्या टेंडरची जबाबदारी ज्या त्या विभागवार द्यावी अन्यथा ते टेंडर रद्द करावे. केंद्रीय आरोग्य विभागाने मास्क खरेदीबाबत दिलेल्या आदेशाच उल्लंघन करत बेकायदेशीर केलेल्या खरेदी बाबत संबंधितावर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. बदली प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत केलेल्या नियमबाह्य बदल्या रद्द करून शासन निर्णयानुसार नव्याने बदल्या कराव्यात अन्यथा सातारा जि.प.सीईओ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना भिक लागल्यामुळेच हा बेकायदेशीर पैसा गोळा करण्याचा खटाटोप त्यांनी चालवलेला आहे. येत्या ४८ तासात वरील दिलेल्या मागण्यांचा विचार होत नसेल तर रयतराज संघटनेच्या वतीने भीक मागो आंदोलन करून ती भीक सातारा आरोग्य विभागाला देण्यात येईल, असा इशारा रयतराज संघटनेने दिला आहे.यावेळी अजित देवकर, संदीप नलावडे, मच्छिंद्र गोगावले, सचिन मोरे, धीरज पवार हे उपस्थित होते.

No comments