Header Ads

धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी खंडाळा तहसीलदारांना रक्त लिखित मागण्यांचे निवेदन khandala

खंडाळा : धनगर ऐक्य अभियानाच्यावतीने खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश धायगुडे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजासाठी एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांचे रक्तलिखित निवेदन खंडाळा तहसीलदारांना देण्यात आले. तालुक्यात रक्ताने लिहिलेले मागण्यांचे निवेदन प्रथमच देण्यात आल्याचे यावेळी बोलले जात होते.


दरम्यान, धनगर ऐक्य अभियानाचे कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर माजी सभापती रमेश धायगुडे यांनी रक्त देऊन हे निवेदन लिहिले. या निवेदनात धनगर समाजाची एसटी प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी, धनगर समाजासाठी शासन निर्णयानुसार घोषित केलेल्या २२ योजनांची अंमलबजावणी त्वरित करावी व त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करावी, सध्या मेंढपाळांवर अनेक हल्ले होत असून, हे हल्ले थांबवून त्यांना संरक्षण द्यावे आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. या मागण्यांबाबत सरकारने गांभिर्याने विचार करून त्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा धनगर समाज महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी बाळासाहेब धायगुडे, बाळासाहेब शेळके, सचिन धायगुडे, हितेश धायगुडे, दादा शेळके, हणमंत धायगुडे, गौरव धायगुडे, जिजाब काळे व विठ्ठल धायगुडे उपस्थित होते.

No comments