Header Ads

हॉटेल ग्रिड फिल्डमधील व्यवस्थापकासह दोघांना मारहाण करून एक लाखाची खंडणी मागत चार हजार रुपये जबरदस्तीने लंपास crime


सातारा :
जेवणाचे पैसे मागितल्याप्रकरणी सदरबझार येथील हॉटेल ग्रिड फिल्डमधील व्यवस्थापकासह दोघांना मारहाण करून एक लाखाची खंडणी मागत चार हजार रुपये जबरदस्तीने लंपास केल्याप्रकरणी सुमारे 15 जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशितोष देशमुख, अनुराग पाटील व त्यांच्या 11 ते 14 साथीदारांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत वैभव सुरेश लवळे (रा. अजिंक्‍यनगर, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (ता. 24) रात्री संशयीतांनी जेवणाचे पैसे मागितल्यावरून हाताने व दांडक्‍याने मारहाण केली. तसेच जेवणाचे 500 रुपये तुझ्या तोंडावर फेकतो परंतु, या पुढे हॉटेल चालवायचे असले तर, एक लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणत पैसे दिले नाहीत तर, हॉटेल कसे चालवतोस तेच बघतो अशी धमकी दिली. तसेच मला व गणेश शिंदे यांना रॉडने गंभिर दुखापत केली. तसेच शर्टच्या खिशातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. असे लवळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक ढेकळे तपास करत आहेत.

No comments