Header Ads

135 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 455 जणांचे नमुने पाठविले तपासणीला satara


सातारा :
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 135 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 455 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 


विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 3, कराड तालुक्यातील 13, खंडाळा तालुक्यातील 1, खटाव तालुक्यातील 4, कोरेगाव तालुक्यातील 6, महाबळेश्वर तालुक्यातील 4,  पाटण तालुक्यातील 7, फलटण तालुक्यातील 67, सातारा तालुक्यातील 27, वाई तालुक्यातील 3 असे एकूण 135 नागरिकांचा समावेश आहे.


455 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 8, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 61, कोरेगांव 53, वाई 39, खंडाळा 30,  रायगांव 30, मायणी 56, महाबळेश्वर 21, दहिवडी 11, खाबली 19 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 127   असे एकूण 455 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुभाष चव्हाण यांनी दिली.

No comments