Header Ads

चक्रीवादळाने नुकसान झालेल्यांना अद्याप मदत नाही हा राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा नाकर्तेपणा : विक्रमबाबा पाटणकर satara

पाटण : १५ व १९ फेब्रुवारी २०२० ला झालेल्या प्रचंड वादळामुळे पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. लॉकडाऊनच्या नावाखाली त्या लोकांना अद्याप एकही रुपयेची मदत मिळालेली नाही. मात्र निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या कोकण व पुणे जिल्ह्यातील काही भागाला ३५० कोटी रुपयेची मदत वाटण्याचे काम पुर्ण झाले. केबिनेट अर्थमंत्री असलेल्या अजितदादांनी आपल्या जिल्हयाला ऐवढा भरीव निधी लोकांच्या मदतीसाठी वाटप केला. मात्र पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्याचे अर्थराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी तालुक्यात चक्रीवादळाने नुकसान झालेल्या नागरिकांना अद्याप मदत आणली नाही हा त्यांचा नाकर्तेपणा म्हणावा लागेल. असे परखड मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

विक्रमबाबा पाटणकर पुढे म्हणाले, निसर्ग चक्रीवादळ येण्याआधी पाटण तालुक्यात अनेक वेळा झालेल्या वादळी वाऱ्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांची-शाळांचे पत्रे, कौले उडून गेली, घरे ढासळली, गुरांच्या गोठ्यांचे, पोल्ट्री फार्म यांचे नुकसान झाले. अनेक संसार उघड्यावर आली. याचा फक्त स्थानिक पातळीवर पंचनामेच झाले. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणालाही दमडीचीही मदत मिळालेली नाही. शेतकरी व नागरिकांच्या नुकसानीच्या प्रस्तावाची फाईल मात्र विभागीय आयुक्त कार्यालयात धुळ खात पडल्या आहेत. यासाठी अर्थ राज्यमंत्री असणाऱ्या शंभुराज देसाई यांनी काय प्रयत्न केले ?. एकीकडे निसर्ग वादळाने नुकसानग्रस्त  झालेल्यांना राज्य शासनाने ३५० कोठीची मदत केली. मात्र त्याच राज्य शासनाचे प्रतिनिधी अर्थ राज्यमंत्री शंभुराज देसाई हे पाटण तालुक्यातील शेतकरी नुकसानग्रसतांना मदत आणू शकले नाहीत. हि शोकांतिका आहे. की त्यांच्या कामाची निष्क्रियता आहे. याची विचारणा तालुक्यातील जनता करत आहे. गतवर्षी २०१९ रोजी पुरपरस्थितीत झालेल्या अनेक शेतकरी नुकसानग्रस्तांना देखील अद्याप मदत मिळालेली नाही. यासाठी लॉकडाऊनच्या काळात देखील उपोषणाला बसून प्रशासकीय लक्ष वेधण्याचे काम केले. मात्र प्रशासन अद्याप झोपी गेले आहे. आठ दिवसात या संदर्भात निर्णय न झाल्यास पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा विक्रमबाबा पाटणकर यांनी दिला आहे.

No comments